Solapur Accident: जुना बोरामणी नाका चौकात डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Accident
Accidentfile photo
Published on
Updated on

सोलापूर : जुना बोरामणी नाका चौकात गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास डंपर आणि दुचाकी अपघातात दुचाकीस्वार नितीन भास्कर झगबघरे (वय 33, रा. धोत्री) यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक जखमी झाला.

भरधाव डंपरने (एमएच 13 ईपी 5222) दुचाकीला (एमएच 13 ईआर 5946) जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की नितीन झगबघरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. व्यवसायाने ड्रायव्हर असलेल्या नितीन यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

मार्केट यार्ड आणि बोरामणी नाका परिसरात अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. या भागात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे वाहतूक सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून जड वाहनांवर नियंत्रण मिळवावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news