Solapur Accident: कार-ट्रक अपघातात धोत्रीतील दोघे ठार

मोहोळ तालुक्यातील तेलंगवाडीजवळ घटना : दोघेही मित्र
Accident
Accidentfile photo
Published on
Updated on

पोखरापूर : मोहोळ तालुक्यातील तेलंगवाडी गावाजवळ कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन तरुण मित्रांचा उपचारा दरम्यान सोलापुरात मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. संकल्प शिवपुत्र गुरव व नागनाथ यल्लप्पा बिराजदार दोघे (रा. धोत्री, ता. दक्षिण सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत.

सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ तालुक्यातील तेलंगवाडी गावाजवळ दि. 12 मे रोजी मध्यरात्री अंदाजे एक वाजण्याच्या सुमारास पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने येत असलेल्या इरटिगा कारने (एम. एच.13, डीटी 8093) समोर जाणाऱ्या ट्रकला (टीएन 54, आर. 8881) पाठीमागून जोरदार धडक दिली.

या अपघातात कारमधील संकल्प शिवपुत्र गुरव (वय 22) व नागनाथ यल्लप्पा बिराजदार (वय 28, दोघेही रा. धोत्री, ता. दक्षिण सोलापूर) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच दोघे मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या अपघाताची नोंद मोहोळ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news