सोलापूर : मंगळवेढ्यातील सोड्डी येथील शेतातून ८ लाखाचा गाजा जप्त

स्थानिक पोलिसांची कारवाई
Solapur News
मंगळवेढ्यातील सोड्डी येथील शेतातून ८ लाखाचा गाजा जप्त करण्यात आला.
Published on
Updated on

मंगळवेढा : सोड्डी (ता. मंगळवेढा) येथील जवसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याप्रकरणी शेतकरी सोमण्णा रामण्णा बिराजदार (वय ५८ , रा. सोड्डी, ता. मंगळवेढा) या शेतकऱ्यावर कारवाई करण्यात आली. या शेतकऱ्याकडून ८ लाख ७९ हजार १६० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सोड्डी (ता. मंगळवेढा) येथे जवसाच्या शेतात गांजाच्या पिकाची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून या शेतकऱ्याच्या शेतातून गांजाची झाडे जप्त केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश वाघमोडे, विजय पिसे, नागेश बनकर यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news