Solapur News: जिल्‍ह्यात ६७० ग्रामपंचायतींचा कारभार अधिकाऱ्यांकडे

विस्‍तार अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, पर्यवेक्षिका, शाखा अभियंत्‍यांसह विविध अधिकाऱ्यांचा समोवश
Gram panchayat news
Gram panchayat newspudhari photo
Published on
Updated on

सोलापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार ६७० अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. यामध्ये विस्‍तार अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, पर्यवेक्षिका, शाखा अभियंत्‍यांसह विविध अधिकाऱ्यांचा समोवश आहे.

याबाबतचा आदेश जिल्‍हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी काढला. शासनाच्या आदेशानुसार पंचवार्षिक मुदत संपलेल्या आणि यापूर्वी प्रशासक असलेल्या जिल्ह्यातील तब्बल ६७० ग्रामपंचायतींवर नव्या प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली.

मुख्य कार्यकारी अधिकारी जैन यांच्या आदेशानुसार संबंधित ग्रामपंचायतींसाठी विस्तार अधिकारी तसेच अन्य विभागांतील अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून मंगळवारी (दि.१५) नियुक्ती करण्यात आली. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका वेळेत न झाल्याने प्रशासक नियुक्त करण्याची वेळ आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news