

सोलापूर : टीईटी परीक्षा रद्द करावी, बीएलओ, एसआयआरसह इतर अशैक्षणिक कामे शिक्षकांना देऊ नये, या प्रमुख मागण्यांसाठी शिक्षकांनी एक दिवसाची सामुहिक रजा घेत गुरुवारी आंदोलन केले.
या आंदोलनात दोन हजार ७१ शाळा बंद ठेवत सहा हजार ३७३ शिक्षक सहभागी झाले होते. त्यामुळे शिक्षक संपात अन् विद्यार्थी वाऱ्यावर अशी परिस्थिती गुरुवारी जिल्ह्यात पाहायला मिळाली. दरम्यान, काही शाळेवर शिक्षक नसताना मुख्याध्यापकांनी शाळा सुरू ठेवला होत्या. मात्र, शिक्षकच नसल्याने विद्यार्थी फक्त वर्गात बसून गेले.
शिक्षकांचे वेतन होणार कपात
जि. प.च्या शाळेत ८,४८८ शिक्षक आहेत. त्यातील ६ हजार ३७३ शिक्षक रजा टाकून आंदोलनात सहभाग झाले होते. त्या सर्व शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
आकडे बोलतात
एकूण शिक्षक : ......८ हजार ४८८
संपात सहभागी : .....६ हजार ३७३
एकूण शाळा : .......२ हजार ८२५
बंद शाळा : ..................२०७१
चालू शाळा : ....................७५४