Solapur News: जिल्‍ह्यातील ६४८ ग्रामपंचायतींचा गाडा हाकणार विस्‍तार अधिकारी

प्रशासक म्‍हणून होणार नियुक्‍ती : ग्रामपंचायत विभागाने मागविली माहिती
Solapur News: जिल्‍ह्यातील ६४८ ग्रामपंचायतींचा गाडा हाकणार विस्‍तार अधिकारी
Published on
Updated on

सोलापूर : जिल्‍ह्यातील ६४८ ग्रामपंचायतींवर विस्‍तार अधिकारी यांची प्रशासक म्‍हणून नियुक्‍ती देण्यात येणार आहे. त्‍यामुळे त्‍या ग्रामपंचायतींचा कारभार आता विस्‍तार अधिकारी हाकणार आहेत.

जिल्‍ह्यात ७५० ग्रामपंचायतींवर प्रशासक आहे. त्‍यातील काही ग्रामपंचायतींच्‍या न्‍यायालयात केसेस चालू आहेत. उर्वरित ६४८ ग्रामपंचायतींवर विस्‍तार अधिकाऱ्यांनाच प्रशासक म्‍हणून नियुक्‍ती देण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. त्‍यानुसार सोलापूर जिल्‍हा परिषदेच्‍या ग्रामपंचायत विभागाने जिल्‍ह्यातील विस्‍तार अधिकाऱ्यांची माहिती मागविली असून, त्‍यांच्‍याकडे आता ग्रामपंचायतींचा कारभार देण्यात येणार आहे.

जिल्‍ह्यात प्रशासक असलेल्‍या ग्रामपंचायतींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्‍यामुळे प्रत्‍येक तालुक्‍यातील पंचायत समिती येथील कृषी, आरोग्य, शिक्षण आणि पंचायत समिती येथील विस्‍तार अधिकाऱ्यांची माहिती मागविली आहे. त्‍यांची माहिती आल्‍यानंतर त्‍यांच्‍याकडे ग्रामपंचायतींचा कारभार सोपविण्यात येणार असल्‍याची माहिती जिल्‍हा परिषदेच्‍या ग्रामपंचायत विभागाने दिली.

तालुकानिहाय ग्रामपंचायत संख्या

मंगळवेढा : २३, पंढरपूर : ७१, करमाळा : ५१, माढा : ८२, माळशिरस : ४६, बार्शी : ९५, मोहोळ : ७२, अक्‍कलकोट : ७१, दक्षिण सोलापूर : ५२, सांगोला : ६१, उत्तर सोलापूर : २४ असे एकूण ६४८ ग्रामपंचायतींचा कारभार विस्‍तार अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येणार आहे.

निधी होणार खर्च

प्रशासक असलेल्‍या ग्रामपंचायतींचा निधी खर्च करता येत नव्‍हता. त्‍यामुळे प्रशासक म्‍हणून विस्‍तार अधिकाऱ्याची नियुक्‍ती करुन निधी खर्च करावा, अशी मागणी सातत्‍याने होत होती. शासनाने त्‍याची दखल घेत विस्‍तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्‍हणून नियुक्‍ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्‍यामुळे आता ग्रामपंचायतीस आलेला निधी खर्च होणार आहे.

जिल्‍ह्यात किती विस्‍तार अधिकारी आहेत. त्‍यांची माहिती मागविली आहे. माहिती येताच तत्‍काळ जिल्‍ह्यातील ६४८ ग्रामपंचायतींवर प्रशासक म्‍हणून विस्‍तार अधिकाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात येईल.
- सूर्यकांत भुजबळ, डेप्‍युटी सीईओ, ग्रामपंचायत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news