Caste Validity Certificate: जातपडताळणीसाठी दररोज दाखल होतात ४०० प्रस्ताव

कार्यालयात सध्या दोन खिडक्यांत पाच कर्मचारी नियुक्त
Caste Validity Certificate: जातपडताळणीसाठी दररोज दाखल होतात ४०० प्रस्ताव
Published on
Updated on

सोलापूर : येथील विभागीय जात पडताळणी समितीच्या कार्यालयात जात पडताळणीसाठी प्रस्ताव सादर करणाऱ्यांची मोठी गर्दी होत असून यासाठी दररोज जवळपास ४०० प्रस्ताव दाखल होत आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाकडून दोन खिडक्यांमध्ये पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून यांच्याकडून प्रस्ताव तपासूनच स्वीकारले जात आहेत.

चालू शैक्षणिक सत्रात विविध शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातून प्रवेश घेणारे व नुकतेच बारावी उत्तीर्ण झालेले शहर जिल्ह्यातील विद्यार्थी जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याकरिता गर्दी करत आहेत. येथील जात पडताळणी समितीत गेल्या काही दिवसापासून प्रस्ताव सादर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रोज जवळपास ४०० प्रस्ताव सादर होत आहेत.

जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पदवी आणि पदव्युत्तर तांत्रिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावे लागते. हे प्रवेश आरक्षित प्रवर्गातून निश्चित केली असेल तर संबंधित शैक्षणिक संस्थांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. तरच, या विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रातील फी मध्ये सवलत मिळते. अन्यथा मिळत नाही. दिलेला प्रवेश रद्द अथवा ते खुल्या प्रवर्गातून निश्चित केली जाते. शैक्षणिक सवलत मिळवण्यासाठी विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी गर्दी केली जात आहे. विद्यार्थी व पालकांना कोणत्याही प्रकारची अडचणी येऊ नये. यासाठी जात पडताळणी समितीच्या प्रशासनाकडून दोन खिडक्यांच्या माध्यमातून पाच कर्मचारी नियुक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news