Solapur Smart Meters: सोलापुरात चार लाख घरांत स्मार्ट मीटर

सातारा येथे ३.५० तर बारामतीत २.३८ लाख स्मार्ट मीटर कार्यान्वित
Smart Meter
Smart Meter pudhari photo
Published on
Updated on

सोलापूर : स्मार्ट मीटरमुळे वाढीव बिल येत असल्याचा ग्राहकांकडून आरोप होत असतानाच सोलापूर मंडळातील ८ लाख १६ हजार ग्राहकांपैकी ४ लाख ४४ हजार ग्राहकांच्या घरात स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत.

घरगुती वर्गवारीत ३ लक्ष ७९ हजार, वाणिजिक्य वर्गवारीत ३६ हजार, औद्योगिक वर्गवारीत १४ हजार ९२७ तर अन्य वर्गवारीत १४ हजार ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. सातारा मंडळातील ८ लक्ष ९० हजार ग्राहकांपैकी ३ लाख ५० हजार ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. त्यात घरगुती वर्गवारीत २ लक्ष ९७ हजार, वाणिजिक्य वर्गवारीत २९ हजार, औद्योगिक वर्गवारीत ८ हजार ४९१ तर अन्य वर्गवारीत १४ हजार ९९१ ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत.

बारामती ग्रामीण मंडळातील ५ लक्ष १२ हजार ग्राहकांपैकी २ लाख ३८ हजार ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. त्यात घरगुती वर्गवारीत १ लक्ष ९५ हजार, वाणिजिक्य वर्गवारीत २५ हजार, औद्योगिक वर्गवारीत ६ हजार ८५५ तर अन्य वर्गवारीत १० हजार ४३९ ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत.

बारामती परिमंडळात १०.३२ लाख मीटर

बारामती परिमंडळातील २२ लक्ष १९ हजार ग्राहकांपैकी १० लाख ३२ हजार ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. त्यात घरगुती वर्गवारीत १९ लक्ष ४३ हजार पैकी ८ लक्ष ७२ हजार, वाणिजिक्य वर्गवारीत १ लक्ष ८६ हजार पैकी ९० हजार तर औद्योगिक वर्गवारीत ४१ हजार ७९९ पैकी ३० हजार २७३ तर पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीत ४७ हजार ५१२ पैकी ३९ हजार ५८१ ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news