Solapur Ganja Seized: ३६ किलो गांजा पकडला; तिघांना अटक

परराज्‍यातून गांजा आणून तो सोलापुरात विकण्याच्‍या तयारीत असलेल्या तिघांना ग्रामीण पोलिसांच्‍या स्‍थानिक गुन्‍हे शाखेच्‍या पोलिसांनी पकडले
Solapur Ganja Seized: ३६ किलो गांजा पकडला; तिघांना अटक
Published on
Updated on

सोलापूर : परराज्‍यातून गांजा आणून तो सोलापुरात विकण्याच्‍या तयारीत असलेल्या तिघांना ग्रामीण पोलिसांच्‍या स्‍थानिक गुन्‍हे शाखेच्‍या पोलिसांनी पकडले. त्‍यांच्‍याकडून ३६ किलो २७० ग्रॅम गांजासह सात लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला.

सचिन लक्ष्मण बनसोडे (वय ३९, रा. टाकळी सिकंदर, ता. मोहोळ), एकनाथ नामदेव लेंडवे (वय ३३, रा. मेथवडे, ता. सांगोला) आणि अनिल लक्ष्मण रोंगे (रा. खर्डी, ता. पंढरपूर) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

स्‍थानिक गुन्‍हे शाखेचे व. पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी अंमली पदार्थ विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्‍या सूचना सहा. पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्‍यांच्‍या पथकास केल्या होत्‍या. त्‍यानुसार वाघ व त्‍यांचे पथक तालुका पोलिस ठाण्याच्‍या हद्दीत गस्‍त घालत असताना मोहन मनसावाले यांना माहिती मिळाली की, बोरामणी जवळील वैष्णवी ढाबा येथे सचिन बनसोडे व एकनाथ लेंडवे हे छत्‍तीसगढ येथून गांजा आणून तो सोलापुरात विकण्याच्‍या तयारीत आहेत. लागलीच ज्ञानदेव वाघ यांनी संजय जगताप यांना याची माहिती दिली. त्‍यानंतर घटनास्‍थळी गेल्यानंतर दोन इसम दोन बॅगा घेऊन रस्‍त्‍याच्‍या कडेला थांबल्याचे दिसून आले.

तपासणीत त्‍यांच्‍याकडे ३६ किलो २७० ग्रॅम गांजा आढळून आला. हा गांजा ते अनिल रोंगे यांना विकण्यासाठी आणल्याचे सांगितले. त्‍यानंतर अनिल रोंगे यालाही अटक करुन तिघांना न्‍यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ही कामगिरी पो. अधीक्षक अतुल कुलकर्णी, विजय कबाडे, संजय जगताप यांच्‍या मार्गदर्शनाखाली ज्ञानदेव वाघ, भिमगोंडा पाटील, ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, हरिदास पांढरे, अनिश शेख, आश्विनी गोटे, अक्षय डोंगरे, सतिश बुरकुल यांनी पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news