Solapur ST Buses : गणरायाच्या दर्शनासाठी २७० एसटी बसेस सज्‍ज

गणेशोत्सवासाठी परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयाकडून विशेष नियोजन
ST Bus
ST Buspudhari photo
Published on
Updated on

सोलापूर : गणेशोत्सवासाठी परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयाकडून विशेष नियोजन केले आहे. मध्यवर्ती बसस्थानकासह जिल्ह्यातील नऊ बसस्थानकांतून तब्बल २७० बसेस धावणार आहेत.

गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या श्रद्धा आणि भक्तीचा उत्सव मानला जातो. या काळात शहरासह जिल्ह्यातील अनेक नागरिक गणेशोत्सवासाठी आपल्या मूळगावी जातात. भक्तांची वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रवासात गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी प्रशासनाने अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. येथील मध्यवर्ती बसस्थानकातून ३० बसेस सोडण्यात येणार आहेत.

तसेच मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, करमाळा, अकलूज, कुर्डूवाडी, बार्शी आणि अक्कलकोट या प्रमुख ठिकाणांहूनही अतिरिक्त एसटी फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. गणरायाच्या आगमनाच्या उत्साहात भक्तांना सुरक्षित, आरामदायी आणि वेळेवर प्रवासाची सुविधा मिळावी, हा या नियोजनाचा उद्देश आहे. महामंडळाच्या या निर्णयाचे गणेशभक्तांकडून स्वागत होत आहे.

गणेशभक्तांचा विचार करून गौरी-गणपती उत्सवासाठी महामंडळाच्या येथील विभागीय कार्यालयाच्या वतीने मध्यवर्तीसह जिल्ह्यातील अन्य नऊ आगारासह २७० एसटी बसेसचे नियोजन केले आहे.
- अमोल गोंजारी, विभागीय व्यवस्थापक परिवहन महामंडळ, सोलापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news