Ashadhi Ekadashi 2025 | आषाढीसाठी सोलापुरातून 250 जादा एसट्यांचे नियोजन

राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यातील विविध आगारांतून पाच हजार 300 एसटी बसचे नियोजन
Ashadhi Ekadashi 2025 |
Ashadhi Ekadashi 2025 | आषाढीसाठी सोलापुरातून 250 जादा एसट्यांचे नियोजनPudhari File Photo
Published on
Updated on

सोलापूर : पंढरपूरच्या आषाढी एकादशी वारीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यातील विविध आगारांतून पाच हजार 300 एसटी बसचे नियोजन केले आहे. त्यात सोलापूर विभागामधून 250 अतिरिक्त एसटी बसेस उपलब्ध असणार असल्याची माहिती येथील आगार प्रशासनाने दिली.

राज्यासह कर्नाटक, आंध्र व तेलंगणासह परराज्यातील लाखो वारकरी दरवर्षी आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी येतात. याही वर्षीच्या आषाढीच्या निमित्ताने लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येणार आहेत. या मोठ्या एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी अन्य जिल्ह्यातून येणार्‍या भाविकांची संख्या जास्त असते. या भाविकांना प्रवासाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व अतिरिक्त बससेवेच्या वाहतुकीचे नियोजन एसटीने केले आहे. पंढरपूरच्या मुख्य बसस्थानकांतून वाढीव वाहतुकीची सोय केली आहे.

ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना सवलती

आषाढी वारीच्या धर्तीवर एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसह महिलांसाठी सवलतीतील तिकिटाचे दर जाहीर केले आहेत. 75 वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत प्रवास, 65 वर्षांच्या पुढील नागरिकांना अर्धे तिकीट आणि महिलांना 50 टक्के सवलतीत प्रवास करता येणार आहे. रेल्वेकडून ज्येष्ठ नागरिकांची तिकीट सवलत योजना बंद केल्याने वारकरी एसटीला पसंती देताना दिसत आहेत.

आषाढी एकादशी-निमित्त वारकरी भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून नियोजन सुरू आहे. सोलापूर विभागातून 250 तर राज्यातून पाच हजार 300 वाढीव बसेसचे नियोजन आहे.
- अनिल गोंजारी, आगार प्रमुख, सोलापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news