Solapur Railway: सिद्धेश्‍वरसह १७ रेल्वे गाड्या रद्द; वंदेभारत पुण्यापर्यंत

कर्जत घाटात भूस्खलन; काही गाड्यांच्या मार्गात बदल
Solapur Railway
Solapur RailwayFile Photo
Published on
Updated on

सोलापूर : लोणावळा–कर्जत घाट या विभागातील ठाकूरवाडी केबिन व मंकी हिल केबिन दरम्यान झालेल्या भूस्खलनामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून, आज सोमवार (दि. ६) रोजी दुपारी २ वाजेपर्यंतच्या पावसाच्या स्थितीच्यानुसार रेल्वे प्रशासनाने १७ गाड्या रद्द करत अन्य ३१ गाड्यांचे मार्ग बदलले असून १८ गाड्या अंशतः रद्द केल्या आहेत. तर १५ गाड्या अंशतः सुरू राहतील. तर ४ गाड्यांचे वेळापत्रकही बदलले आहे.

सोलापूर मार्गाशी संबंधित एकूण ११ गाड्यांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यापैकी तीन गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. यात गाडी क्रमांक १२११५ सोलपूर मुंबई सिध्देश्वर, गाडी क्रमांक १२१६९ पुणे–सोलापूर इंटरसिटी, गाडी क्रमांक १२१७० सोलापूर–पुणे इंटरसिटी आदी एक्सप्रेस गाड्यांचा यात समावेश आहे.

तसेच, याशिवाय २२२२६ सोलापूर–सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी पुण्यापर्यंतच धावणार असून ११३०२ बेंगळुरू–सीएसएमटी एक्सप्रेस सोलापूरपर्यंतच मर्यादित ठेवली आहे. दुसरीकडे २२२२५ सीएसएमटी–सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस पुण्यापासून पुढे सुरू करण्यात येणार असून १६३५१ एलटीटी–नागरकोइल एक्सप्रेस दौंड येथून सुटणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news