Solapur tragic incident: मैदानावरील रोलर अंगावर गेल्याने 15 वर्षीय मुलाचा मृत्यू

बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनच्यावतीने बार्शीतील शिवशक्ती मैदानावर आयोजित उन्हाळी क्रिकेट शिबिरात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली
Solapur tragic incident: मैदानावरील रोलर अंगावर गेल्याने 15 वर्षीय मुलाचा मृत्यू
Pudhari
Published on
Updated on

बार्शी : बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनच्यावतीने बार्शीतील शिवशक्ती मैदानावर आयोजित उन्हाळी क्रिकेट शिबिरात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. पिच तयार करण्यासाठी असलेला रोलर अंगावरून गेल्याने आरव ऊर्फ वीरेन योगीराज चौधरी (वय 15) या नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मृत आरवचे वडील योगीराज चौधरी (45, रा. सुभाषनगर, बार्शी) यांनी दिलेल्या जबाबानुसार येथील मैदानावर उन्हाळी क्रिकेट शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

फी भरून आरवला कॅम्पमध्ये प्रवेश दिला होता. कोच विवेक दुगम व अक्षय देबडवार हे प्रशिक्षण देत होते. सकाळी 6 वाजता आरव नेहमीप्रमाणे सरावासाठी गेल्यावर 7 ते 7.30 च्या दरम्यान 12 ते 15 वर्षांच्या मुलांकडून कोचच्या सांगण्यावरून रोलर ओढून घेतला जात होता. त्यावेळी जवळ कोणताही प्रशिक्षक, तज्ज्ञ किंवा मोठी व्यक्ती हजर नव्हती. कोच लांब उभे होते. रोलर ओढताना आरवचा तोल गेला व तो खाली पडला. पायापासून छातीपर्यंत रोलर अंगावरून गेल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्याला तत्काळ जगदाळे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news