Solapur News: जिल्ह्यात 1000 मेट्रिक टन चारा उपलब्ध; मोफत वाटणार

प्रतिदिन 100 मेट्रिक टन चार्‍याची आवश्यकता
Solapur News |
Solapur News: जिल्ह्यात 1000 मेट्रिक टन चारा उपलब्ध; मोफत वाटणारFile Photo
Published on
Updated on

सोलापूर : सीना नदीला आलेल्या महापुरामुळे 88 गावांत पाणी शिरले. त्यामुळे जनावरांचा चारा, घरातील पशुखाद्य, कडबा, मुरघास वाहून गेल्याने मोफत चारा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रतिदिन 100 मेट्रिक टन चारा लागणार असून, आत्तापर्यंत 1 हजार मेट्रिक टन चार्‍याची उपलब्धता झाली आहे.

शनिवारी (दि. 27) चारा वाटप करण्यास सुरुवात होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. जनावरांच्या चार्‍यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली होती. दरम्यान, सांगोला येथून 30 मेट्रिक टन चारा शासकीय डेपोतून ट्रकमधून पुरबाधित गावांकडे शुक्रवारी रवाना झाला. सांगली येथून चारा आणण्यासाठी वाहने गेली आहेत. इतर तीन जिल्ह्यातील जिल्हाधिकार्‍यांशी चार्‍याबाबत बोलणे झाले असून, खासगी व्यक्तींनी दिलेल्या चार्‍यासाठी स्थळे निश्चित केली आहेत.

बाधित 10 किलो तांदूळ, गहू वाटप

पुरग्रस्तांना पुरवठा विभागाच्या बफर स्टॉकमधून प्रतिकुटुंब 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू दिले जाणार आहे. स्वयंसेवी संस्था, नागरिकांना मदत करायची असेल तर जिल्हा आणि तालुका स्तरावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news