

सोलापूर : डॉ. स्मिता जाधव या उच्चशिक्षित आहेत. त्या पदवीधरांचे यशस्वीपणे नेतृत्व करतील. पुणे पदवीधर मतदार संघासाठी त्या सक्षम आणि उत्तम उमेदवार आहेत, त्या निवडून येतील असे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
डी. वाय. पाटील विद्यापीठ (पिंपरी) पुणेच्या प्रभारी कुलगुरु डॉ. स्मिता जाधव यांना भारतीय जनता पार्टीने पुणे पदवीधर मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बुधवारी सोलापुरात पत्रकारांशी संवाद साधतानाही त्यांनी माहिती दिली.
डॉ. स्मिता जाधव यांना सासर आणि माहेरची राजकीय पार्श्वभूमी लाभली आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. महिला सक्षमीकरण आणि उद्योग क्षेत्रात त्यांनी आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटविला आहे. डॉ. स्मिता जाधव यांच्या नव्या कल्पना, सर्जनशीलता आणि धोरणात्मक नेतृत्वाला संधी मिळाली आहे. त्या सक्षमपणे नेतृत्व करतील असा विश्वासही यावेळी गोरे यांनी व्यक्त केले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी उपस्थित होते.