Solapur Slab Collapse Accident: बबलाद येथे स्लॅबचा ढपला कोसळून १३ विद्यार्थी, दोन शिक्षक जखमी

जि. प.कन्नड शाळेतील घटना
Solapur Slab Collapse Accident: बबलाद येथे स्लॅबचा ढपला कोसळून १३ विद्यार्थी, दोन शिक्षक जखमी
Published on
Updated on

उडगी : अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेत मंगळवार दि. ११ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास शाळेच्या इमारतीच्या स्लॅबचा ढपला अचानक कोसळून १३ विद्यार्थी व दोन शिक्षक जखमी झाले.

अर्थव मड्डी, श्रीमंत मणुरे, प्रज्वल न्हावी, लक्ष्मीपुत्र खानापुरे, शरणबसप्पा खानापुरे, प्रशांत चांभार, दर्शन चव्हाण, प्रज्वल बोळदे, अनुष्का मड्डी, सिद्धार्थ पुजारी, विशाल अचगोंड, मानसी खानापुरे आणि सिद्धार्थ कलशेट्टी अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत. तर, रमेश शिवमूर्ती आणि भीमण्णा गवळी अशी जखमी शिक्षकांची नावे आहेत. जखमी विद्यार्थी व शिक्षकांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, मैंदर्गी तसेच दुधनी येथील आरोग्य कर्मचाऱ्यांकडून प्राथमिक उपचार करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच उपसभापती सागर कल्याणशेट्टी, दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे, बीडीओ शंकर कवितके, डॉ. मंजुनाथ पाटील, षणमुख विभुते, इस्माईल मुजावर, चिदानंद गुरव, जय नाटकर, सूर्यकांत गोविनाड, रेणुका पवार, विलास पोतदार, सिद्धू नंदर्गी, महानंद घंटे यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.

इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी

जिल्हा परिषद शाळेची इमारत विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आहे की नाही, याची वेळोवेळी तपासणी केली जाते का? धोकादायक इमारतींची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करण्यासाठी प्रशासन आणखी किती दुर्घटनांची वाट पाहणार? असा संतप्त सवाल पालक व ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे. बबलाद येथील घटनेनंतर इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, सुरक्षित पर्यायी वर्गखोल्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news