बनावट कागदपत्रे सादर प्रकरणी महिलेसह सहा जणांवर गुन्हा दाखल

बनावट कागदपत्रे सादर प्रकरणी महिलेसह सहा जणांवर गुन्हा दाखल
Solapur News
बनावट कागदपत्रे सादर प्रकरणी महिलेसह सहा जणांवर गुन्हा दाखलfile photo

पोखरापूर : जमिनीच्या मूळ मालकाऐवजी बनावट कागदपत्रे लिहून देणारी व्यक्ती उभी करुन खोटे कुलमुखत्यारपत्राचे दस्त बनवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी मोहोळ येथील दुय्यम निबंधकांनी सहा जणांविरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला झाला आहे. या सहा जणांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. अर्चना भाऊसाहेब पाटील, रत्नाकर गायकवाड, नागेश खेला सातपुते (मयत), नामदेव अगनू बरकडे, दासू गेना साबळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास जगन्नाथ साळुंखे व सुहास जगन्नाथ साळुंखे ( रा. काटी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव) यांची मोहोळ तालुक्यातील मौजे शेजबाभुळगांव येथे गट नं. २८४ /२/ अ/१ / ड यात क्षेत्र ३ हे. ०३ आर व सुहास जगन्नाथ साळुंखे, यांचे गट नं. २८४ /२ /३ /१/ अ यात क्षेत्र १ हे. ६२ आर व गट नं. २४२ /१/अ क्षेत्र २ हे.०२ आर. या मिळकती आहेत. दि. ८ मे २०२३ रोजी विकास साळुंखे यांनी मोहोळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयाला पत्रव्यवहार करत तक्रार दाखल करून माझ्या जागी बनावट व्यक्ती उभी करून अर्चना भाऊसाहेब पाटील यांनी दस्त केल्याचे सांगितले.

तसेच दि. १० ऑक्टोंबर २०१३ मध्ये स्वतःच्या नावे कुलमुखत्यारपत्र रजिस्टर करून घेतले. त्यासाठी वापरले गेलेले फोटो, ओळखपत्र, सह्या माझ्या नाहीत सदर दस्ताची दुय्यम निबंधक कार्यालयातून नोंदणी करताना मी सुहास साळुंखे व विकास साळुंखे उपस्थित नव्हतो. आमच्या जागी इतर व्यक्ती उभी करून अर्चना पाटील यांनी खोटे व बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करून घेतले. तसेच सदरच्या बनावट कुलमुखत्यार पत्राच्या आधारे सातबारा उतारा व महसूल रेकॉर्ड सदरी फेरफार नोंद असल्याचा गैरफायदा घेतला आहे. त्या आधारे दि. ४ एप्रिल २०२२ रोजी स्वतःच्या मुलीचे नावे अर्चना पाटील यांनी बेकायदेशीर व पोकळ खरेदीखत करून दिले असून त्यांनी माझी व शासनाची फसवणूक केली असल्याबाबत तक्रारीत म्हटलं आहे.

त्या तक्रारीच्या अनुषंगाने दुय्यम निबंधक कार्यालय मोहोळ यांनी चौकशी केली असता त्यामध्ये लिहून देणार म्हणून बनावट व्यक्ती उभी करून अर्चना भाऊसाहेब पाटील ( रा. नेर, चेबूर मुंबई) यांनी कुलमुखत्यारपत्र करून घेतल्याचे निदर्शनास आले. त्यासाठी साक्षीदार/ओळखदार रत्नाकर गायकवाड, नागेश खेला सातपुते (मयत), नामदेव अगनू बरकडे,दासू गेना साबळे यांनी साक्षीदार म्हणून ताब्यात घेतले आहे.

अर्चना पाटील यांच्यासह वरील पाच जणांविरोधात बनावट कागदपत्रे व व्यक्ती सादर करुन कुलमुखत्यारपत्रांचे खोटे दस्त नोंदणी करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद मोहोळचे दुय्यम निबंधक धनंजय अरविंद गोरे यांनी दिली असून स.पो.नि. एस.के. ओलेकर करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news