

पंढरपूर : पंढरपूरच्या सिंहगड महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील केदार धनंजय घाडगे (वय 20) या विद्यार्थ्याने कॉलेजच्या वसतिगृहात पंख्याला टॉवेलने गळफास घेऊन जीवन संपवले. शुक्रवारी दुपारी 12 वाजता हा प्रकार घडला.
धाराशिव जिल्ह्यातील केदार घाडगे गेल्या दोन वर्षापासून सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज येथे शिक्षण घेत होता. केदारच्या आत्महत्येचे कारण अद्याप जरी स्पष्ट झाले नाही. मात्र एकतर्फी प्रेम प्रकरणातून केदारने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. पोलिस तपास करत आहेत.