श्री शिवाजी महाविद्यालय बार्शीला विजेतेपद

विद्यापीठ युवा महोत्सव; संगमेश्वर कॉलेज व विद्यापीठ अधिविभागास दुसरे तर केबीपी पंढरपूरला तिसरे बक्षीस
Solapur University youth Festival
वडाळा (ता. उत्तर सोलापूर) ः येथील लोकमंगल महाविद्यालयात झालेल्या युवा महोत्सवात सर्वसाधारण विजेतेपद पटकाविलेला श्री शिवाजी महाविद्यालय बार्शीचा संघ.Pudhari Photo
Published on
Updated on

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 20 व्या युवा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद पुन्हा एकदा बार्शीच्या श्री शिवाजी महाविद्यालयाने पटकावले. दुसर्‍या क्रमांकाचे विजेतेपद संगमेश्वर कॉलेज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिविभागास विभागून मिळाले. तिसरे पारितोषिक प्रस्थापितांना धक्का देत पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाने पटकावले. वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालय विद्यापीठाचा युवा महोत्सव उत्साहात झाला. शुक्रवारी (दि. 4) पारितोषिक वितरण झाले. यावेळी सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर उपस्थित होते. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरण झाले. यावेळी आमदार सुभाष देशमुख, संस्थेचे अध्यक्ष रोहन देशमुख, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, कोमल देशमुख, प्रा. देवानंद चिलवंत, राजाभाऊ सरवदे, प्रा. सचिन गायकवाड, चन्नवीर बंकुर, डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. राजेंद्र वडजे उपस्थित होते.

Solapur University youth Festival
Eknath Shinde in Nashik : मुख्यमंत्री शिंदे आज नाशिकमध्ये, राष्ट्रीय युवा महोत्सव तयारीचा घेणार आढावा

विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी प्रास्ताविक केले. ललित विभागाचे विजेतेपद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिविभागाने पटकावले. वांग्मय विभागाचे विजेतेपद कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूरला मिळाले. नाट्य विभागाचे विजेतेपद संगमेश्वर महाविद्यालयाने प्राप्त केले. संगीत विभागाचे सर्वसाधारण विजेतेपद शिवाजी कॉलेजला मिळाले. लोककला विभागाचे विजेतेपद डी. ए. व्ही. वेलणकर महाविद्यालय आणि शिवाजी महाविद्यालय बार्शी यांना विभागून दिले. सूत्रसंचालन आणि पारितोषिकाचे वाचन डॉ. यशपाल खेडकर यांनी केले.

Solapur University youth Festival
कोल्हापुरात उद्यापासून दसरा महोत्सव

विधाते गोल्डन गर्ल तर शेख गोल्डन बॉय

युवा महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या विद्यार्थिनीस गोल्डन गर्ल तर विद्यार्थ्यास गोल्डन बॉयचे बक्षीस दिले जाते. यंदाच्या गोल्डन गर्लची मानकरी बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्नेहल विधाते तर गोल्डन बॉयचा किताब संगमेश्वर महाविद्यालयाचा विद्यार्थी जैद शेख याने पटकाविला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news