Nira Bhima Sangam: नीरा-भीमेच्या प्रीतीसंगमावर शिवविचारांचा जागर

शिवप्रेमींनी उभारला नदीच्या पात्रात छ. शिवरायांचा अश्वारूढ पुतळा
Nira Bhima Sangam
Nira Bhima Sangam: नीरा-भीमेच्या प्रीतीसंगमावर शिवविचारांचा जागरPudhari
Published on
Updated on
गोपाळ लावंड

माळीनगर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, भारतीय आरमार दलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

दरम्यान, संगम (ता. माळशिरस) येथील इंगळे वस्तीनजीक नदीपात्रात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारून आकर्षक देखाव्याचे सादरीकरण येथील स्थानिक शिवप्रेमी तरुणांनी केले आहे. हा देखावा बघण्यासाठी पंचक्रोशीतील शिवभक्त तसेच नागरिकांनी गर्दी केली आहे. पाण्यातील देखाव्यापर्यंत जाण्यासाठी नदीकाठावरून यांत्रिक बोटीची सोय या शिवप्रेमी तरुणांमार्फत मोफत करण्यात आली आहे.

अतिशय काळजीपूर्वक नदीच्या पात्रामध्ये पोकळ बांबू, फळ्या, तसेच रबरी ट्यूब, टायर, मोकळे ड्रम यांचा उपयोग करून मजबूत तरंगता तरफा तयार करण्यात आला आहे. यावर शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभा करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली आहे. रात्रीच्या वेळी या देखाव्याला पाहण्यासाठी विशेष गर्दी होत आहे. आकर्षक पद्धतीने सजविलेला देखावा पाहण्यासाठी विशेष व्यवस्था केल्यामुळे नागरिकांकडून शिव जयंतीचे विशेष कौतुक होत आहे.

या देखाव्यास माळशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते, प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. एम. के. इमानदार, डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील, भाजप नेते विक्रम पराडे-पाटील, डॉ. श्रद्धा जवंजाळ यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी काका पराडे, सागर इंगळे, पप्पू इंगळे, कल्याण इंगळे, लाव्हा पराडे, नरा इंगळे, दयानंद इंगळे, विकी इंगळे, अमोल भोई यांनी परिश्रम घेतले. सोलापूर आणि पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या बंधाऱ्याजवळ नीरा आणि भीमा या दोन नद्यांचा संगम होऊन पुढे पंढरपूरकडे भीमा नदी वाहत जाते. या प्रीतीसंगमावर अशा पद्धतीने शिवजयंतीचा उत्सव साजरा केल्याने परिसरात वातावरण शिवमय झाले होते.

सदर देखावा उभा करण्याची संकल्पना युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे, शिल्पकार प्रवीण नगरे कौठाळी यांनी चार दिवस अहोरात्र कष्ट घेतले. त्यांना शुभम भोई, विकास भोई, ओम पराडे, प्रशांत पराडे, अक्षय पराडे, आदित्य भोई, आदित्य इंगळे, प्रतीक इंगळे, शंभू भोई, अविनाश भोई यांनी सहकार्य केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news