दिंडीत टेम्पो घुसून दोन वारकरी ठार; ५ जण गंभीर जखमी

बार्शी तालुक्यातील शेळगाव येथील घटना
Shelgaon tempo accident
दिंडीत टेम्पो घुसून दोन वारकरी ठार; ५ जण गंभीर जखमीfile photo
Published on: 
Updated on: 

वैराग : बार्शी तालुक्यातील शेळगाव (आर) येथे वारकऱ्यांच्या दिंडीत टेम्पो घुसून दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तर पाच वारकरी जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास शेळगाव गावानजीक घडली. वासुदेव गवळी आणि तुकाराम जाधव अशी मृत वारकऱ्यांची नावे आहेत. तर लखन अडसूळ, दिनेश लोहार, तुकाराम गिलबिले, ज्योतिराम शेळके, निळकंठ अडसूळ हे गंभीर जखमी झाले आहेत.

शेळगाव येथील वारकरी कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठूरायाचे दर्शन घेऊन माघारी आपल्या गावाजवळ असणाऱ्या वस्तीवर उतरले. तेथून विणा व पताका घेऊन चालत गावाकडे जात होते. त्याचवेळी एमएच ४५ ए एफ ०८३४ क्रमांकाचा टेम्पो चालक अशोक प्रकाश मेनकुदळे (रा. वैराग) याचा ताबा सुटल्याने वारकऱ्यांच्या दिंडीत घुसला. यामध्ये दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टेम्पो चालकाविरुद्ध वैराग पोलिसात गुन्हा दाखल झाला असुन या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. एन. जगदाळे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news