Solapur Share Market Fraud : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष; शिक्षकांची ३५ लाखांची फसवणूक

विजयपूर नाका पोलिस ठाण्यात संशयितावर गुन्हा दाखल
Share market fraud
Share market fraudfile photo
Published on
Updated on

सोलापूर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून शिक्षकांची ३५ लाख २७ हजार रुपयांची फसवणूक झाली. याप्रकरणी विजयपूर नाका पोलिस ठाण्यात संशयित राजू रामचंद्र बुटले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२५ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत विजापूर रोड येथील पद्मश्री रामसिंग भानावत हायस्‍कूलमध्ये हा प्रकार घडला. फिर्यादी आग्रेलो ऑस्‍टिन डिक्रुज (वय ५९, रा. पोस्‍टल कॉलनी, होटगी रोड ) यांची संशयित बुटलेसोबत ओळख झाली होती. त्याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी विश्वास संपादन करत आग्रेलो व इतर शिक्षकांचे मिळून ३५ लाख २७ हजार रुपये घेतले. परंतु ना परतावा दिला, ना घेतलेली रक्‍कम परत दिली.

त्‍यानंतर संशयिताने जमीन असून ती विकून गुंतवणुकीची संपूर्ण रक्कम परत करणार असल्याचे फिर्यादीला सांगितले; पण आग्रेलो यांना प्रत्यक्षात पैसे परत दिले नाही. त्‍यानंतर २७ जून रोजी संशयित चार दिवसांसाठी सुट्टीवर निघून गेला, त्‍यानंतर तो आलाच नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डिक्रुज यांनी विजापूर नाका पोलिसांत राजू बुटले याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news