

वैराग : गुन्ह्यात आरोपी करुन चोरलेल्या शेळ्या गुन्ह्याच्या तपासात जप्त केल्याचा राग मनात धरुन जमावाद्वारे पोलिसास धक्काबुकी करुन शिवीगाळी व दमदाटी केली.
संशयित आरोपी आनंद शिंदे व त्याच्या सोबतच्या इतर महीला प्रिया काळे, संगीता पवार, राणी आनंद शिंदे, सुनिता सतिश शिंदे, अंजना आनंद शिंदे, किर्ती काळे सर्व रा. ढोराळे (ता. बार्शी) अशी गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तिंची नावे आहेत.
वैराग पोलीस ठाण्यात शेळ्या चोरीचा गुन्हा दाखल होता. शुक्रवारी दि.20 जून रोजी तपासातील संशयित आरोपी आनंद शिंदे (रा. ढोराळे) याने गुन्ह्यातील चोरीला गेलेल्या शेळ्या यावली गावाच्या परीसरामध्ये ठेवल्याची माहीती मिळाल्याने पोलिसांनी पथकासह सदर ठिकाणी जावून गुन्हातील चोरीस गेलेल्या दोन शेळ्या व दोन पिल्ली जप्त केली होती. त्यानंतर शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास वैराग पोलिस ठाण्याच्या आवारात संशयित आरोपीने जमाव जमवून सरकारी कामात अडथळा आणल्यावरून एकूण सात जणांवर वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.