Silk farming: रेशीम शेती ठरतेय शेतकऱ्यांसाठी मोठे वरदान

सोलापूर जिल्ह्यातून 20 कोटींची उलाढाल
Silk farming: रेशीम शेती ठरतेय शेतकऱ्यांसाठी मोठे वरदान
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी रेशीम शेती ही वरदान ठरली असून, सोलापूर जिल्ह्यातील 977 शेतकऱ्यांनी 1260 एकर क्षेत्रावर तुती लागवड केली असून 7 लाख 92 हजार 250 अंडीपुंजांपासून 4 लाख 59 हजार 476 कोष उत्पादन झाले आहे. यामधून सुमारे 20 कोटी 67 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे, अशी माहिती जिल्हा रेशीम अधिकारी विनित सुनीता पवार यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यात महा रेशीम अभियान 2026-27 अंतर्गत 10 फेब्रुवारी ते 11 मार्च 2026 या कालावधीत नवीन तुती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांना 11 मार्चपर्यंत ‌‘आपले सरकार‌’ या पोर्टलवर वस्त्रोद्योग विभाग निवडून ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे. तुती लागवडीद्वारे एक एकर क्षेत्रातून दुसऱ्या वर्षापासून दोन लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न शेतकरी मिळवत असल्याचेही पवार यांनी सांगितले.

सिल्क समग्र योजनेतून अनुदान

केंद्र पुरस्कृत ‌‘सिल्क समग्र‌’ योजनेअंतर्गत प्रति एकर तुती लागवडीसाठी व सिंचन संचासाठी प्रत्येकी 45 हजार, कीटक संगोपन गृहासाठी 2 लाख 43 हजार 750, संगोपन साहित्यासाठी 37 हजार 500 व निर्जंतुकीकरण औषधासाठी 3 हजार 750, असे एकूण 3 लाख 75 हजार रुपये अनुदान देण्यात येते. तर बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी ‌‘सिल्क समग्र-2‌’ योजनेतून दोन एकर तुती शेतीसाठी 5 लाख 62 हजार 500 रुपये अनुदान दिले जाते.

येथे सुरू आहेत कोष बाजारपेठा

जालना, बीड, बडनेरा, सोलापूर, बारामती व नागपूर येथे कोष बाजारपेठा सुरू करण्यात आल्या आहेत.

मनरेगातून मिळते अनुदान

मनरेगा अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना एक एकर तुती लागवड, जोपासना व कीटक संगोपन गृहासाठी तीन वर्षांत एकूण 895 मनुष्यदिवसांची मजुरी दिली जाते. यामध्ये मजुरीपोटी 2 लाख 79 हजार 240 रुपये व साहित्यासाठी 1 लाख 53 हजार रुपये, असे एकूण 4 लाख 32 हजार 240 रुपये अनुदान देण्यात येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news