

सोलापूर : वारंवार होणार्या रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील टॅ्रक किलोमीटर रेल्वे मार्गावर कवच (ट्रेन कॉलेजन अँड अॅडव्हान्स सिस्टीम) बसविण्यात येणार आहे. यामुळे सोलापूर विभागातून धावणार्या रेल्वेला आता सुरक्षेचे कवच असणार असल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.
रेल्वे अपघात टाळण्यासाठी रेल्वे मध्य रेल्वे प्रशासनांकडून मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर, भुसावळ विभागात टॅ्रक किलोमीटरवर कवच प्रणाली स्थापित करण्यात येणार आहे. रूळ व इंजिन अशा दोन्ही ठिकाणी कवच प्रणाली बसविण्यात येणार आहे. पाचही विभागातून याचे टेंडर ओपन झाल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. एकंदरीत या प्रणालीमुळे रेल्वेचा प्रवास सुरक्षित होऊन अपघात टळण्यास मदत होणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर आणि भुसावळ या विभागातील लोको पायलट व सहाय्यक लोको पायटलना या कवच प्रणालीचे सिकंदराबाद येथे प्रशिक्षण देण्यात येत आहे. कवच प्रणाली सुरु होताच याचा त्यांना रेल्वे संचलनामध्ये फायदा होणार आहे.
रेल्वेच्या रिसर्च डिझाईन्स अँड स्टँडर्स ऑर्गनायझेशनने विकसित केलेली ही प्रणाली टाळेबंदी आणि सिग्नल पासिंगसारख्या घटनांना टाळण्यासाठी उपयुक्त आहे. एकाच रूळावर दोन रेल्वे आल्यास पाच किलोमीटर अंतर असतानाच लोको पायलटस्ला सतर्क करते, रेल्वेच्या वेगाचे सतत निरीक्षण, तसेच वेगावरही प्रभावी कार्यक्षम आहे.