Solapur News: शाळेकडून विशिष्ट विक्रेत्याची सक्ती

शिवसेनेकडून निवेदन, कमिशनखोरीच्या प्रकाराची शक्यता व्यक्त
Solapur News: शाळेकडून विशिष्ट विक्रेत्याची सक्ती
Published on
Updated on

सोलापूर : शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या पालकांना एका विशिष्ट विक्रेत्याकडूनच शालेय बूट खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याचा गंभीर आरोप करत शिवसेनेने शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.

शाळा प्रशासनाने शाळेच्या परिसरातच बूट विक्रीची व्यवस्था करून पालकांवर आर्थिक भार टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण आणि महानगरप्रमुख महेश धाराशिवकर यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून हा प्रकार नियमबाह्य असल्याचे म्हटले आहे.

पालकांच्या हक्कांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरण्यास तयार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या तक्रारीमुळे शहरातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून शिक्षण विभाग या प्रकरणात कोणती भूमिका घेतो, याकडे पालकांसह शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news