

सोलापूर : सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या माध्यमातून तालुकास्तरावर बारावी नंतरचे शिक्षण घेणार्या इतर मागासवर्गीय या आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 38 हजार रूपयेचे अनुदान दिली जाणार आहे. ही योजना बहुजन कल्याण विभागाच्या वतीने राबवली जात आहे.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेतून कोष्टी, माळी, तेली, धनगर, कुणबी, कुंभार, सुतार, लोहार, फुलारी, गुरव, साळी आणि बंजारा यासह अन्य जातीच्या समूहातील बारावी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना राहणे आणि जेवणासाठी येणारा खर्च म्हणून 38 हजार रुपये अनुदान दिली जाते. रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाते. ज्या पालकाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे. अशा पालकाच्या प्रत्येक विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. जाती दाखल्यासह विद्यार्थ्याशी दिव्यांगमधून अर्ज भरल्यास दिव्यांग आणि अनाथमधून अर्ज भरल्यास महिला बालकल्याण विभागाकडून प्रमाणपत्र अनिवार्य आहे.