श्री संत नामदेव पायरीचा दरवाजा चांदीने मढविला

कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके; 30 किलो चांदीचा वापर
Pandharpur News |
पंढरपूर : विठ्ठल मंदिरात नामदेव पायरी दरवाजा चांदीने मढविल्याचे दिसत आहे.Pudhari Photo
Published on
Updated on

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील श्री संत नामदेव पायरीच्या दरवाजाला 30 किलो चांदीचा वापर करून मढविण्यात आले आहे. यासाठी सुमारे 33 लाख 75 हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. नांदेड येथील भाविक अरगुलवार परिवारातर्फे दरवाजाला चांदी बसवून देण्यात आल्याची माहिती मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

भाविक शंकर दिगंबर अरगुलवार व नरसिमलू दिगंबर अरगुलवार यांनी कै. दिगंबर तुकाराम अरगुलवार व कै. जनाबाई दिगंबर अरगुलवार आई-वडिलांच्या स्मरणार्थ सदरचे काम मोफत करून दिले आहे. अरगुलवार हे भाविक श्री विठ्ठल- रुक्मिणीमातेचे निस्सीम भक्त आहेत. नियमित दर्शनासाठी येत असतात. ते बिलोली जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहेत.

नामदेव पायरी दरवाजासाठी सुमारे 30 किलो चांदीचा वापर करण्यात आला आहे. यासाठी सुमारे 33 लाख 75 हजार इतका मजुरीसह खर्च आला आहे. याकामी कारागीर म्हणून मे. जव्हेरी ज्वेलर्स पंढरपूर यांनी सेवा दिली आहे. तसेच त्यांनी 26 ग्रॅम सोने घंटण श्री रूक्मिणीमातेच्या चरणी, तर 19.9 ग्रॅम सोने व 45 ग्रॅम चांदीचे जानवे श्री विठ्ठलाच्या चरणी अर्पण केले आहे. त्याची बाजारमूल्यानुसार सुमारे 4 लाख 18 हजार इतकी किंमत होत असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news