Pandharpur News | संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्यास प्रारंभ

पंढरीत दोन दिवस भरगच्च कार्यक्रम; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित
Pandharpur News |
Pandharpur News | संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्यास प्रारंभFile Photo
Published on
Updated on

पंढरपूर : संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार व संत जनाबाई यांच्या षष्ठशतकोत्तर (675 वा) संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त पंढरपूर येथे आज बुधवार दि. 23 व गुरुवार दि. 24 जुलै रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराज मंडळी उपस्थित राहणार आहेत.

संत नामदेव महाराज व परिवाराच्या षष्ठशतकोत्तर (675 वा) संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त दोन दिवस विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या समवेत पालकमंत्री जयकुमार गोरे, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिणीनाथ महाराज औसेकर, भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले, आ. समाधान आवताडे, माजी आ. प्रशांत परिचारक, अभिनेते गोविंद नामदेव, खासदार, आमदार, महाराज मंडळी उपस्थित राहणार आहेत.

संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान असलेल्या संत नामदेव मंदिर येथे पौर्णिमेपासून धार्मिक कार्यक्रम व अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला आहे. मंगळवार दि. 22 रोजी द्वादशी दिवशी क्षीरापत कार्यक्रम झाला. तर आज बुधवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत संत नामदेव मंदिर येथे ह.भ.प. नामदास महाराज यांचे संत नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यावर आधारित किर्तन होणार आहे. त्यानंतर गुलाल पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. संत नामदेव मंदिर, संत नामदेव पायरी व श्री विठ्ठल मंंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दर्शन घेणार आहेत. तसेच मानकर्‍यांच्या हस्ते महानैवेद्य दाखविण्यात येणार आहे. त्यानंतर एल.आय.सी. कार्यालयासमोरील आरती मंडप मनमाडकर हॉल येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी संत नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प. नामदास महाराज कुटुंबातील 5 महाराजांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते संत पूजन होणार आहे. यानंतर संत नामदेव मंदिर येथे सर्वांना मुक्तद्वार महाप्रसाद देण्यात येणार आहे.

गुरुवार दि. 24 जुलै रोजी सकाळी 10 ते 12 वाजता ह.भ.प. नामदास महाराजांचे काल्याचे कीर्तन होईल. सायंकाळी 6 वाजता शाही दिंडी लवाजम्यासह संत नामदेव महाराजांच्या पालखीची नगर प्रदक्षिणा होणार आहे. यावेळी शिंपी समाज बांधव, संत नामदेव भक्त मंडळी, महाराज मंडळी उपस्थित राहणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news