Sangola news : थकबाकीच्या ओझ्याखाली शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना

59 गावांकडे 1 कोटी 61 लाखांची थकबाकी; सहा वर्षांनंतरही मंगळवेढा-पंढरपूर पंचायत समितीकडील बिले प्रलंबित
Sangola news
Sangola news : थकबाकीच्या ओझ्याखाली शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनाPudhari
Published on
Updated on

सांगोला : सांगोला तालुक्याची जीवनदायिनी ठरलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उपविभागांतर्गत कार्यरत शिरभावी व 81 गावांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेवर थकबाकीचे संकट गडद झाले आहे. जानेवारी 2026 अखेर 59 गावांकडे तब्बल 1 कोटी 61 लाख 61 हजार 558 रुपये इतकी थकबाकी आहे. योजनेच्या आर्थिक व्यवस्थापनावर ताण निर्माण झाला आहे. सावे, चिंचोली, महूद बु., खवासपूर, लक्ष्मीनगर, वाढेगाव, मेथवडे, मांजरी, कोळा, वाकी नरळे वस्ती, जुजारपूर आदी गावे थकबाकीत आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

शिरभावीसह 81 गावांना वर्षभर अखंडितपणे पाणीपुरवठा करणारी योजना म्हणून या योजनेचा राज्यात नावलौकिक आहे. पण वेळोवेळी थकबाकीची रक्कम वाढत असल्याने ही योजना आर्थिक संकटात सापडली आहे. अनेक गावांची थकबाकी मोठया प्रमाणावर आहे. दुष्काळी असलेल्या सोलापूर जिल्ह्यात ऐन उन्हाळ्यात देखील वेळेवर पाणीपुरवठा होणारा तालुका म्हणून सांगोला तालुक्याची ओळख आहे. सांगोला तालुक्याची जीवनदायिनी ठरलेली शिरभावी पाणीपुरवठा योजना थकबाकीमुळे आर्थिक संकटात सापडली आहे. सोलापूर जिल्ह्यात ऐन उन्हाळ्यातही वेळेवर पाणीपुरवठा होणारा तालुका अशी सांगोल्याची ओळख या योजनेमुळेच निर्माण झाली. मात्र वाढत्या थकबाकीमुळे योजनेच्या देखभाल, दुरुस्ती व नियमित खर्च भागविणे कठीण होत चालले आहे. अनेक गावांची थकबाकी लाखोंच्या घरात पोहोचल्याने प्रशासन चिंतेत आहे.

थकबाकी असलेली गावे पुढीलप्रमाणे, कंसात थकबाकीची रक्कम- शिरभावी (2,82,169), संगेवाडी (94,058), मेथवडे (12,29,215), मेथवडे माळी वस्ती (2,47,532), देवळे (1,18,650), मांजरी (9,43,420), बामणी (2,65,424), सावे (3,85,569), धायटी (1,01,029), चिंचोली (3,23,858), हलदहिवडी (72,349), वाकी शिवणे (2,79,861), शिवणे (2,28,732), खिलारवाडी (60,607), महूद बु. (27,40,609), महिम (1,74,395), गायगव्हाण (18,549), देवकतेवाडी (2,72,017), खवासपूर (4,30,891), एखतपुर (90,853), लोटेवाडी (2,30,849), कटफळ (4,288), अचकदाणी (2,84,434), लक्ष्मीनगर (5,17,657),

सोनलवाडी (19,011), बागलवाडी (6,697), वाकी नरळे वस्ती (4,57,618), वाकी घेरडी (635), वाणीचिंचाळे (684), आलेगाव (2,35,588), घेरडी (85,026), मेडशिंगी (20), वाढेगाव (13,36,800), लोणविरे (27,234), हणमंतगाव (1,075), कडलास (30,736), आगलावेवाडी (27,587), बुरुंगेवाडी (74,880), जवळा (1,33,974), राजूरी (95), कारंडेवाडी (2,78,900), तरंगेवाडी (70,375), भोपसेवाडी (2,66,576), नाझरे (73,154), वझरे (3,71,223), अनकढाळ (4,246), अजनाळे (132), य. मंगेवाडी (88,333), गोडसेवाडी (12,300), कमलापूर (3,485), अकोला वा. (2,55,696), कोळा (7,29,903), बुद्धेहाळ (18,852), सोमेवाडी (1,52,617), राजापूर (87,573), हबीसेवाडी (1,35,133), डिकसळ (3,955), हंगीरगे (1,40,541), जुजारपूर (2,50,430), हायवे कोळा (20,898) अशी एकूण 59 गावांकडे तब्बल 1 कोटी 47 लाख 98 हजार 462 रुपयांची थकबाकी आहे. तर 25 गावांनी थकबाकी भरली आहे.

पंढरपूर, मंगळवेढा पंचायत समितीकडे थकबाकी

2018 च्या दुष्काळात नागरिकांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी शिरभावी योजनेमधून मंगळवेढा व पंढरपूर पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला टँकर भरण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले होते. परंतु, सहा वर्षांनंतरही मंगळवेढा व पंढरपूर पंचायत समितीने शिरभावी योजनेची बिले थकवली आहेत. मंगळवेढा पंचायत समितीकडे 2 लाख 89 हजार 226 रुपये, पंढरपूर पंचायत समितीकडे 43 हजार 200 रुपये, सांगोला तहसिल कार्यालयाकडे 2 लाख 45 हजार 185 इतकी थकबाकी आहे. शेतकरी सूत गिरणीकडे 7 लाख 59 हजार 100 रुपये, महिला सूतगिरणीकडे 26 हजार 386 थकबाकी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news