Sangola Crime: सांगोला परिसरात हातभट्टी दारू विक्री जोमात

सांगोला शहरासह ग्रामीण भागातील गावोगावी विषारी हातभट्टी दारू विक्री व विना परवाना देशी विदेशी दारू विक्री ही जोमात चालू आहे
Sangola Crime: सांगोला परिसरात हातभट्टी दारू विक्री जोमात
Published on
Updated on

सांगोला : सांगोला शहरासह ग्रामीण भागातील गावोगावी विषारी हातभट्टी दारू विक्री व विना परवाना देशी विदेशी दारू विक्री ही जोमात चालू आहे. या विषारी हातभट्टी दारूमुळे अनेक दारू पिणारे मरण पावले आहेत. तर अनेक जण मरणाच्या दारावर आहेत. तसेच अनेकांचे दारूमुळे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या अवैध दारू विक्रेत्यांवर किरकोळ कारवाई केली जाते, तर या पकडलेल्या किती दारू विक्रेत्यांवर कोणत्या विभागात गुन्हे दाखल होतात, हा संशोधनाचा विषय आहे.

अनेक वेळा महिन्यातून एकदा राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी खासगी गाडी घेऊन येतात. दारू विक्री करणाऱ्यांना पकडतात व त्यांच्याकडून हजार रुपयापासून 10 हजार रुपयांपर्यंत रोख रक्कम घेतात. त्यांना त्याच ठिकाणी सोडून देतात, या अवैध हातभट्टी दारूला व विना परवाना देशी-विदेशी दारूला राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी विभागाच्या आशीर्वादाने सांगोला तालुक्यात अवैध हातभट्टी दारू विक्री जोमात चालू आहे. याचा त्रास महिला, सर्वसामान्य नागरिक यांना होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

सांगोला शहरासह ग्रामीण भागात गल्लीबोळातील व्यावसायिकांनी हातभट्टी व देशी -विदेशी दारू विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे. या विक्रेत्यांना हातभट्टी दारू पुरवठा करण्यासाठी तालुक्यातील अनेक भागात हातभट्टीची केंद्रही सुरू केली आहेत. ही हातभट्टी दारू युरिया, काही रासायनिक व केमिकल वापरून तयार केलेली ही दारू असते. त्यातच नासका गूळ, इतर रासायनिक केमिकल यामुळे या दारूचा उग्र वास असतो. तसेच ही दारू कसल्याही भांड्यात, बाटल्यात, डब्यात, ट्यूबमध्ये भरली जाते. यामुळे ही दारू विषारी झाली आहे. ही हातभट्टी दारू ओढ्याला, डोंगर, दऱ्या, झाडी यामध्ये तयार केली जाते.

अनेक ठिकाणी राजरोसपणे उत्पादन केले जाते. याकडे कोणाचेही लक्ष नाही. तर तालुक्यामध्ये गावोगावी एक ते पाच ठिकाणी गल्ली बोळात अवैध देशी-विदेशी दारू विक्रीची दुकाने थाटली आहेत. या दुकानदारांना राजरोसपणे दिवसा व रात्री चारचाकी, दुचाकी गाडीवरून देशी व विदेशी दारूचे बॉक्स पोहोच केले जातात. हा व्यवसाय सध्या राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने मोठ्या धुमधडाक्यात सांगोला तालुक्यात चालू आहे.

अनेक लोक दारू सेवनाने मरणही पावले आहेत. याला आशीर्वाद कोणाचा, हा संशोधनाचा विषय आहे. सध्या बाजारपेठेमध्ये परवानाधारक दुकानात देशी दारूची 180 मिलीची बाटली मिळते तर हीच बाटली अवैध दारू विक्रेत्यांकडे 100 रुपयाला मिळते व विदेशी दारुच्या एका बाटलीमागे शंभर रुपयाहून अधिक जादा पैसे दारू विक्रेत्यांना द्यावे लागतात. यातील विदेशी दारूही बनावट असल्याची चर्चा आहे. तर हातभट्टी दारूची बाटली केवळ 20 रुपयाला मिळते. ही दारू स्वस्त मिळत असल्याने तलफ भागविण्यासाठी सर्वसामान्य दारू पिणाऱ्यांनाही परवडते. पण ही हातभट्टी दारू विषारी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news