Sangola Accident : बाजार करून निघालेल्या पती पत्नीचा अपघातात मृत्यू

सांगोला-पंढरपूर रोडवरील देशमुख वस्तीजवळील घटना
Sangola Accident News
बाजार करून निघालेल्या पती पत्नीचा अपघातात मृत्यू
Published on
Updated on

सांगोला : आठवड्याचा बाजार करून घराकडे निघालेल्या पती पत्नीच्या मोटारसायकलला टेम्पोची पाठीमागून धडक बसल्याने अपघात झाला. या दांम्पत्याचा मृत्यू झालो. ही घटना रविवार, दि.22 मार्च रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास सांगोला-पंढरपूर रोडवरील देशमुख वस्तीजवळ घडली आहे. रामचंद्र पांडुरंग बनसोडे (वय 60), लक्ष्मी रामचंद्र बनसोडे (वय 55) दोघे रा.बामणी, ता. सांगोला अशी मृतांची नावे आहेत.

रामचंद्र पांडुरंग बनसोडे व त्यांच्या पत्नी लक्ष्मी रामचंद्र बनसोडे हे दोघेजण रविवारी सांगोल्याचा आठवडा बाजार करून मोटारसायकलवरून बामणी येथील घराकडे जात होते. दरम्यान, पंढरपूर रोडवरील देशमुख वस्ती येथे वळणावर पाठीमागून भंगार भरून येणाऱ्या टेम्पोने क्रमांक (एम. एच. 11 ए. एल. 4672) त्यांना जोराची धडक दिली. वळण असल्या कारणाने ट्रकचालकास त्याचे वाहन कंट्रोल करता आले नसावे. त्यामुळे समोरील मोटारसायकलला धडक देताच टेम्पो आडवा पडला. त्यातील भंगार रस्त्यावर पडले. यावेळी मोटारसायकल चालक रामचंद्र बनसोडे हे भंगार खाली सापडल्याने परिसरातील नागरिक व पोलिसांच्या मदतीने तसेच क्रेनच्या सहायाने भंगार बाजूला करून रामचंद्र बनसोडे यांचा मृतदेह बाजूला काढला. तर त्यांच्या पत्नीदेखील यामध्ये गंभीर जखमी झाल्याने मृत पावल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news