MSRTC News: चिंचणी यात्रेतून सांगोला आगारास 8 लाखांचे उत्पन्न

112 फेऱ्यांद्वारे 4 लाख 34 हजार भाविकांनी केला प्रवास
MSRTC news
MSRTC news (File photo )
Published on
Updated on

सांगोला : सांगोला तालुक्यातून श्री मायाक्का देवीच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक भक्त चिंचणी यात्रेसाठी जात असतात. यासाठी सांगोला आगारातून 29 ज्यादा बसेसची सुविधा पुरविण्यात आली होती. एकूण 112 फेऱ्यांमध्ये 4 हजार 34 प्रवाशांनी प्रवास केल्याने आगारास 8 लाख 10 हजार 463 एकूण उत्पन्न झाले. त्यापैकी 1 लाख 59 हजार 864 सवलत सोडता प्रत्यक्ष उत्पन्न 6 लाख 50 हजार 599 रुपयांचे निव्वळ उत्पन्न झाले आहे.

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देवी-देवतांना जास्त महत्त्व दिले जाते. ज्याच्या त्याच्या सध्या चिंचणी या ठिकाणी असणाऱ्या श्री मायाक्का देवीची यात्रा मोठ्या प्रमाणावर भरली आहे. चिंचणी येथील मायाक्का देवी हे देवस्थान कर्नाटक राज्यामध्ये आहे. सांगोला येथून हे देवस्थान 150 कि.मी. लांब आहे. मागीलवर्षी यात्रा कालावधीमध्ये 40 गाड्यांच्या माध्यमातून 14 हजार 667 कि. मी. प्रवास केला. लालपरीने आगारास 9 लाख 56 हजार 163 रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले होते.

चालूवर्षीदेखील 42 ग्रुपसाठी 29 गाड्यांचे नियोजन करण्यात तर त्यांच्या 112 फेऱ्या पूर्ण झाल्या. यामध्ये 4 हजार 34 प्रवाशांनी 10 हजार 129 कि. मी. प्रवास करून आगारास 8 लाख 10 हजार 463 एकूण उत्पन्न झाले. त्यापैकी 1 लाख 59 हजार 864 सवलत सोडता प्रत्यक्ष उत्पन्न 6 लाख 50 हजार 599 रुपयांचे निव्वळ उत्पन्न झाले आहे. त्यामुळे गतवेळच्या तुलनेत यंदा चिंचणी यात्रा कालावधीमध्ये कमी उत्पन्न झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news