Sangola Theft Case: सांगोल्यात कारची काच फोडून ४ लाख रुपयांची रोकड लंपास

साई गणेश गॅस एजन्सीसमोर भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Sangola Theft Case
Sangola Theft Case
Published on
Updated on

सांगोला : पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर दिवसाढवळ्या कारची काच फोडून तब्बल चार लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची धाडसी घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. साई गणेश गॅस एजन्सीसमोर भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांसमोर चोरट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यलमर मंगेवाडी (ता. सांगोला) येथील अमोल सखाराम येलपले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते पत्नी अर्चना यांच्यासह सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास मित्राची एमएच १३ बीएन ७७९१ क्रमांकाची चारचाकी गाडी घेऊन सांगोला येथील आयसीआयसीआय बँकेत गेले होते. तेथून त्यांनी चार लाख रुपये काढले. ही रोकड प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये ठेवून चारचाकी वाहनात ठेवली.

त्यानंतर दोघेही मार्केट यार्ड परिसरातील एचपी गॅस सेंटर येथे गेले. अमोल येलपले हे गाडी लॉक करून पत्नीसह गाडीतून उतरले. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी काही क्षणांत कारची काच फोडून आत ठेवलेली चार लाख रुपयांची रोकड घेऊन भरधाव वेगाने पसार झाले. गाडीची काच फुटल्याचे दिसताच अर्चना यांनी गाडीकडे जाऊन पाहिले असता त्यांना पैशाची बॅग दिसली नाही. याबाबत सांगोला पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news