

सांगोला : रत्नागिरी-नागपूर या महामार्गावर अनकढाळ टोल नाका येथे काही वाहनचालक कथित एन्ट्री वसुलीच्या प्रकाराबाबत गंभीर तक्रारी करत आहेत. या आरोपांमुळे परिसरात नेहमीच उलटसुलट चर्चा होत असते. अनेकदा वाहने अडवून चौकशी, कागदपत्रांच्या नावाखाली त्रास आणि वेळेचा अपव्यय यामुळे चालक- प्रवाशी हैराण झाले आहेत. नियमांची अंमलबजावणी करताय की चालकांना वेठीस धरताय? असा संतप्त सवाल वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे.
रत्नागिरी-नागपूर या महामार्गावर अनकढाळ टोळ नाका येथे वाहनांची तपासणी व वाहनचालकांना त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करावी. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांमधून होत आहे. सध्या तीव्र स्वरूपाचा उन्हाळा सुरू आहे. सुमारे 42-43 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाचा पारा वाढत आहे. भर उन्हातदेखील अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचारी वाहनांच्या तपासणीच्या नावाखाली रस्त्यावर उभे असलेले दिसतात. अडवणूक करुन वाहनचालकांना नाहक त्रास देतात. दिवसरात्र रस्त्यावर कष्ट करणाऱ्या चालकांना कथित त्रासामुळे आर्थिक फटका बसत असल्याचे बोलले जाते. यातून मानसिक तणावही वाढत आहे.स्थानिक वाहन चालकांना अडवूनदेखील अनेकदा पोलिस कर्मचारी त्रास देतात. वरिष्ठांनी याबाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी व वाहनधारकांतून होत आहे.
स्थानिक वाहन चालकांना अडवूनदेखील अनेकदा पोलिस कर्मचारी त्रास देतात. वरिष्ठांनी याबाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी व वाहनधारकांतून होत आहे.