

सांगोला : सांगोला तालुक्यात शालेय पोषण आहार ठेवण्याच्या गोडाऊन मध्ये घुशीचा वावर असून तांदळामध्ये उंदराच्या आणि घुशीच्या लेंड्या आढळून आल्या. हा प्रकार सामाजिक कार्यकर्त्यांनी निदर्शनात आणला. या नंतर हे गोडाऊन शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सील केले आहे. शालेय पोषण आहारामधील तांदळामध्ये उंदराच्या व घुशीच्या लेंड्या आढळल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेत .
सांगोला तालुक्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरवठा केला जातो हा आहार ठेवण्यासाठी कमलापूर (ता. सांगोला) येथे गोडाऊन आहे. या गोडाऊन मधून सर्व शाळांना आहार पाठवला जातो. पण या गोडाऊनमध्ये उंदरांचा व घुशीचा वावर आहे. तसेच तांदळामध्ये घुशीच्या व उंदराच्या लेंड्या आढळून आल्या. याबाबत सामाजिक कार्यकर्ते नितिन रणदिवे, दीपक ऐवळे, महेश वाघमारे, प्रवीण वाघमारे, पप्पू आयवळे यांनी हा प्रकार शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिला. गुरुवारी रात्री उशिरा शिक्षण विभागाचे अधिकारी व अन्नभेसळ अधिकारी यांनी हे गोडाऊन सील केले.