

सोलापूर : येथील राज्य कामगार विमा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एक 23 वर्षीय महिलेने जन्म दिलेले बाळ मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर महिलेच्या नातेवाइकांनी येथील विमा रुग्णालयात गोंधळ घातला. या घटनेची संपूर्ण निःपक्षपाती चौकशीसाठी समिती गठीत करून चौकशी करण्याचे पत्र दिल्याचे माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. यशया शिरशेट्टी यांनी दिली.
तिसऱ्या प्रसूतीसाठी सदर गरोदर महिला येथील विमा रुग्णालयात महिला वार्डात काल सोमवार (दि. 13) रोजी दाखल झाल्या. दिवसभरात सोनोग्राफी व रक्ताच्या तपासण्या झाल्या. सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये बाळ आईच्या पोटात मृत झाल्याची माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली. त्यानंतर सदर महिलेच्या नातेवाइकांनी डिस्जार्च घेतला. मंगळवारी सकाळी सदर महिलेच्या नातेवाईकांनी विमा रुग्णालयात येऊन काहीवेळ गोंधळ घातला. नातेवाईकांना चौकशी करण्याचे पत्र देण्यात आले.