

सोलापूर : पुढील महिन्यात जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या बदल्या होणार आहेत. यामध्ये दिव्यांग, दुर्धर आजाराचे प्रमाणपत्र दाखवून बदलीचा लाभ घेणार्या कर्मचार्यांच्या प्रमाणपत्राची फेरतपासणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.
पत्रकारांनी सीईओ जंगम यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अधिकारी, कर्मचार्यांच्या बदल्या अगोदरच प्रमाणपत्रांची फेरतपासणी करण्यात येणार आहे. तसे पत्र लवकरच काढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सीईओ जंगम म्हणाले, मे महिन्यात जिल्हा परिषदेच्या कर्मचार्यांच्या बदल्या होणार आहेत. यामध्ये दिव्यांग, दुर्धर आजाराचे प्रमाणपत्र असलेल्या खर्या दिव्यांगावर अन्याय होऊ नये, यासाठी दिव्यांग प्रमाणपत्राची फेर तपासणी केली जाईल.
दरम्यान, मे महिन्यातील पाच आणि सहा तारखेला जिल्हा परिषदेतील कर्मचार्यांच्या बदल्या होणार आहेत. तर सात मे रोजी एका विभागात पाच वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचार्यांच्या बदल्या होणार आहेत. त्याअगोदरच बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा लाभ घेऊन बदली घेणार्या कर्मचार्यांच्या प्रमाणपत्राची तपासणी व्हावी, अशी मागणी दिव्यांग कर्मचार्यांतून होत आहे.