Action against naturopathy center: रत्नप्रभा निसर्गोपचारवर अ‍ॅक्शन

विजापूर नाका पोलिस ठाण्यात डॉक्टरांची रवानगी, कारवाई
Action against naturopathy center|
सोलापूर : विजापूर रोडवरील सोरेगाव येथील व्ही. बी. कुंभार यांच्या रत्नप्रभा निसर्गोपचार आयुर्वेदिक संशोधन केंद्राची तपासणी महापालिका आरोग्य विभागाने केली.Pudhari Photo
Published on
Updated on

सोलापूर : महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी शनिवार, दि. 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सोरेगाव येथील डॉ. कुंभार यांच्या रत्नप्रभा नैसर्गिक उपचार आयुर्वेदिक संशोधन केंद्रांमध्ये अचानक जाऊन झाडाझडती घेतली. यावेळी हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्या असून, कागदपत्रांची पूर्तता संबंधित डॉक्टरांनी केली नाही. या डॉक्टरांची वरात विजापूर नाका पोलिस ठाण्यात आणण्यात आली.

विजापूर रोडवरील सोरेगावामध्ये व्ही. बी कुंभार यांचे रत्नप्रभा निसर्गोपचार आयुर्वेदिक संशोधन केंद्र आहे. त्यांची मुलगी डॉक्टर ऐश्वर्या कुंभार यादेखील या हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. त्याशिवाय आणखी एक डॉक्टर आहेत. या हॉस्पिटलला आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी अनेक वेळा भेट देऊन कागदपत्रांची मागणी केली होती. मात्र हॉस्पिटलने कोणत्याही कागदपत्राची पूर्तता केली नाही. त्यामुळे शनिवारी आरोग्य अधिकार्‍यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन कागदपत्रांची आणि इतर गोष्टींची तपासणी केली. यावेळी हॉस्पिटलमध्ये डॉ. ऐश्वर्या कुंभार रुग्णांच्या तपासणी करत होत्या. रुग्णांच्या मोठ्या रांगा हॉस्पिटलमध्ये लागल्या होत्या.

आरोग्य अधिकार्‍यांच्या तपासणीमध्ये हॉस्पिटलमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यानंतर विजापूर नाका पोलिस स्टेशन ठाण्याच्या पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासंदर्भात बोलावून घेण्यात आले. डॉक्टरांची वरात विजापूर रोड पोलिस ठाण्यात आणण्यात आली. डॉक्टरांनी कागदपत्राच्या संदर्भात तपासणी करण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितली आहे. सोमवारी कागदपत्राची तपासणी करून हॉस्पिटलवर कारवाई केली जाणार असल्याचे डॉ. आरोग्य अधिकारी राखी माने यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news