

सोलापूर : महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड मोठ्या संकटाला सामोरे जात असताना केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अहवालानुसार शेतकर्यापेक्षा शेतमजुरांचे उत्पन्न जास्तीचे आहे. आकडेवारीनुसार राज्यात दिवसाला आठ शेतकर्यांच्या आत्महत्या होत आहेत. याला चुकीचे शेती धोरण व सरकार जबाबदार आहे. शेतकर्यांसाठी स्वामिनाथन अयोग लागू होणे गरजेचे आहे. निवडणुकपूर्वी भाजपने आमचे सरकार आले की, शेतकर्यांचा सातबारा कोरा झाला नाही. याच्याविरोधात राष्ट्रीय समाज पक्षाने जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रशासनास निवेदन दिले असून, सरसकट कर्जमाफी न केल्यास आंदोलनाचा इशारा रासपच्यावतीने देण्यात आले आहे.
करमाळा : शेतीसाठी लागणारी मशागत, मजुरी, खते,बी-बीयाणे,औषधांची झालेली प्रचंड महागाईमुळे शेती करणे तोट्याचे बनले आहे. शेतकर्यांच्या आत्महत्या होत आहेत. याला जबाबदार शासन जबाबदार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकार आले की, शेतकर्यांचा उतारा कोरा करणार म्हटले होते.त्यांचे काय झाले? असे म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते यांनी प्रसिद्ध निवेदनाद्वारे म्हटले आहे. या निवेदनाची प्रत करमाळा निवासी नायब तहसीलदार विजय लोकरे यांना देण्यात आले. यावेळी रासप जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, बाळासाहेब टकले, जगन्नाथ सलगर, नामदेव पालवे, शिवाजी खटके, विकास मेरगळ, सुधीर ठोंबरे, सुनील बंडगर, रघुनाथ खटके, यशवंत सलगर, शंकर सुळ, दिपक कडू इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. जाहीर केल्याप्रमाणे शेतकर्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा.आणि तालुक्यातील अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना तात्काळ पैसे देण्यात यावेत,अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा अंगद देवकते यांनी दिला आहे.
मोहोळ : महाराष्ट्रातील शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देऊन शासनाने शेतकर्यांचा सातबारा कोरा करावे, या मागणीचे निवेदन मोहोळ तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले.
महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड मोठ्या संकटाला सामोरे जात असताना केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अहवालानुसार शेतकर्यांपेक्षा शेतमजुराचे उत्पन्न जास्तीचे आहे.शेती करणे नुकसानीचे बनले आहे.
अहवालानुसार दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत.अशा कठीण काळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर केले होते की, आमचे सरकार आल्यास शेतकर्यांचा सातबारा कोरा करणार आज त्यांनी हे धाडस दाखवण्याची वेळ आली आहे.मोहोळ तहसीलदार यांच्यामार्फत आम्ही शासनाला कळवत आहोत. शेतकर्याला संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा. अशी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून मागणी करीत आहोत. याची नोंद शासनाने घ्यावी अन्यथा लवकरच तीव्र आंदोलन छेडले जाईल असे निवेदनात म्हटले आहे.
हे निवेदन मोहोळ चे तहसीलदार सचिन मुळीक यांना देण्यात आले.यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे परमेश्वर पुजारी, अभिमान काळे, अशोक पुजारी, नागेश हजारे, दिनेश सातपुते, नवनाथ शिंदे, भुजंग मळगे,बाळासाहेब वाघमोडे, जयप्रकाश मोरे आदी शेतकरी, रासप पदाधिकारी उपस्थित होते.
अक्कलकोट : महाराष्ट्रातील शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा यामागणीचे निवेदन राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने अक्कलकोटचे नायब तहसीलदार दत्तात्रय गायकवाड यांना रासप महाराष्ट्र प्रदेश सचिव सुनील बंडगर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. शेतकरी संकटाला सामोरे जात असताना केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अहवालानुसार शेतकर्यापेक्षा शेतमजुराचे उत्पन्न जास्तीचे आहे. अहवालानुसार दिवसाला आठ शेतकर्यांची आत्महत्या होत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर केले होते की, आमचे सरकार आल्यास शेतकर्याचा सातबारा कोरा करणार पण काहीच केले नाही. तहसीलदार यांच्यामार्फत आम्ही शासनाला कळवीत आहे. शेतकर्याला संपूर्ण कर्जमाफी करत सातबारा कोरा करावा अशी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून मागणी करीत आहे.अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रासपच्यावतीने देण्यात आले. अक्कलकोट तालुकाध्यक्ष दत्तात्रय माडकर, उपाध्यक्ष महादेव पुजारी, तिपण्णा घोडके, रेवणसिध्द शेरी, निलेश लवटे, संतोष शिंदे, गौरीशंकर गायकवाड, रवी पुजारी, दाजी कोळेकर आदी उपस्थित होते.