Ranjita Chakote: स्थायी समितीच्या सभापतिपदी रंजिता चाकोते बिनविरोध

क्रेनच्या साह्याने भव्य हार घालून पुष्पवृष्टी करत पर्यावरणपुरक जल्लोष
Ranjita Chakote
Ranjita Chakote: स्थायी समितीच्या सभापतिपदी रंजिता चाकोते बिनविरोधPudhari
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूर महापालिका स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपच्या रंजिता चाकोते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अठरा मिनिटांच्या निवड प्रक्रियेनंतर चाकोते यांचा एकमेव अर्ज असल्याने पिठासीन अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली. त्यानंतर महापालिका आवारात क्रेनच्या सहाय्याने हार घालून तसेच चार जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करत पर्यावरण पूरक जल्लोष साजरा करण्यात आला.

स्थायी समितीच्या सभापती पदाच्या निवडीची सभा पिठासीन अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी निऱ्हाळी यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी सकाळी 11 वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात पार पडली. प्रारंभी नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी निवड प्रक्रियेची माहिती दिली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची उपस्थिती होती.

सभापती पदासाठी दाखल करण्यात आलेले नामनिर्देशन पत्र महापालिका नगरसचिव दंतकाळे यांनी सादर केले. भाजपच्या रंजिता चाकोते यांचे दोन अर्ज प्राप्त झाले होते. पिठासीन अधिकारी यांनी छाननी करून दोन्ही अर्ज वैध असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर पिठासीन अधिकारी यांनी सभेच्या नियमाप्रमाणे अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ दिला.

त्यानंतर पंधरा मिनिटांनी सकाळी 11.18 वाजता विहित वेळेत अर्ज मागे घेतला नाही. सभापती पदासाठी चाकोते यांचा एकच अर्ज प्राप्त झाला आहे. त्यामुळे मतदान घेण्याची आवश्यकता नाही. यामुळे रंजिता चाकोते यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.

सभापतीपदी बिनविरोध निवडीची घोषणा झाल्यानंतर रंजिता चाकोते यांचा महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेविका तथा भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, स्थायी समिती सदस्य, नगरसेवक- नगरसेविका यांच्यासह नातेवाईकांनी चाकोते यांचा सत्कार केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news