Ramdas Athawale | भाजपबरोबर युती नसल्यास स्वबळावर : ना. आठवले

आगामी निवडणुकांबाबत कुर्डूवाडीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कार्यकर्ता मेळावा
Ramdas Athawale |
कुर्डूवाडी : येथे रामदास आठवले यांचा सत्कार करताना रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब जगताप, अमर माने व इतर.Pudhari Photo
Published on
Updated on

कुर्डूवाडी : राज्यात येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपसमोर युतीचा प्रस्ताव ठेवा, त्यांनी समाधानकारक जागा दिल्या नाही तर इतर पक्षाशी युती करा. मात्र राष्ट्रवादी शरद पवार व ‘उबाठा’ सेनेच्या नादी लागू नका, प्रसंगी स्वतंत्र लढा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले.

ना. आठवले यांच्या अध्यक्षतेखाली तुळजाई लॉन्स कुर्डूवाडी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चा मेळावा झाला. याप्रसंगी ते बोलत होते. ना. आठवले पुढे म्हणाले, मी सुरुवातीच्या काळात गावोगावी फिरून पक्ष मजबूत केला. दलित पँथरच्या शाखा गावोगावी होत्या. त्यांचे बोर्ड जुन्या काळात सर्व ठिकाणी दिसायचे. मात्र आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बोर्ड व शाखा गावात दिसत नाहीत, याची खंत वाटते. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडीसारखा राजकीय पॅटर्न राबवून जि. प.च्या व नगरपालिकेत जास्तीत जास्त सदस्य निवडून आणा. केवळ एका बौद्ध समाजाच्या जातीवर सदस्य निवडून येऊ शकत नाही, यामुळे इतर जातीतील लोकांनाही आपल्या पक्षात घेण्याचे आवाहन ना. आठवले यांनी केले .

रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी आपले सहयोगी पक्ष निवडणुकीत व नंतरही आपल्याला विचारात घेत नाहीत, यामुळे स्थानिक निवडणुकांमध्ये स्वतंत्रपणे लढण्यासाठी निर्णय घ्यायचा आम्हाला अधिकार द्या, अशी विनंती सरवदे यांनी आठवलेंना केली. प्रास्ताविक अमर माने यांनी केले. यावेळी सुनील सर्वगोड, जितेंद्र बनसोडे, बाळासाहेब शेंडगे, दशरथ कसबे, सोमनाथ भोसले, संजय बनसोडे, हनुमंत कसबे, नागनाथ ओहोळ, श्यामसुंदर गायकवाड, मारुती वाघमारे यांनी पक्षवाढी संदर्भात विचार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी सूरज जगताप, आकाश जगताप, बंडू भोसले, समद मुलाणी, सुहास शेंडगे, सौरभ गायकवाड, शाहिद मुलाणी, सिद्धार्थ इंगळे, अण्णा नायडू, कृष्णा अस्वरे, सोमनाथ माने, सिकंदर शेख, विजय देवकते, भैया चांदणे, अनिकेत नवगिरे, रवी एडके, कपिल शिवशरणसह पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news