Railway Mega Block | मेगा ब्लॉकमुळे रेल्वे सेवा ठप्प
सोलापूर : रेल्वे मार्गावरील जुन्या पुलाच्या पाडकामामुळे आज रविवारी रोजी रेल्वेने मेगा ब्लॉक घेतला होता. याचा मोठा फटका येथील प्रवाशांना बसला. रेल्वेच्या महत्त्वाच्या गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांना परिवहन महामंडळाच्या लाल परीचा आधार मिळाला.
मेगा ब्लॉकमुळे येथील रेल्वे प्रवाशांची गर्दी महामंडळाच्या मध्यवर्ती बस स्थानकाकडे वळली. पुणे, मुंबईसह अन्य ठिकाणी जाणार्या जाणार्या प्रवाशांची गर्दी येथील स्थानकात दिसून आले. प्रवाशांची ही वाढती संख्या लक्षात घेऊन येथील विभागीय कार्यालयाने मुंबई व पुणेसह अन्य मार्गावर जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला. नियमित गाड्यांसोबतच केवळ पुणे मार्गावर वाहतुकीसाठी या आगारातून दिवसभरात 12 जादा बसेस धावल्या. याशिवाय, इतर आगारांमधून पुणे मार्गासाठी 38 जादा गाड्या सोडण्यात आल्या. यामुळे, एकूण 50 हून अधिक जादा बसेस धावल्यामुळे एसटीच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली, तसेच रेल्वेमुळे झालेल्या प्रवाशांच्या गैरसोयीवर एसटीने प्रभावी उपाययोजना केली. एसटीच्या या तत्परतेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.

