Gas e-KYC: क्यूआर कोडने करा ई-केवायसी

गॅस एजन्सीसमोर रांगा न लावण्याचे आदेश
QR code
QR codePudhari
Published on
Updated on

सोलापूर : गॅस एजन्सी समोर ई- केवायसी करण्यासाठी रांगा लावू नका. आता घरी बसूनच क्यूआर कोडच्या मदतीने गॅसचे ई- केवायसी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्तिकेयन म्हणाले, शहरात बीपीसीएल, आयओसीएल व एचपीसीएल या तीन गॅस कंपनीच्या एकूण 20 गॅस एजन्सी कार्यरत आहेत. गॅस एजन्सी समोर नागरिक हे ई- केवायसीसाठी तसेच गॅस सिलिंडर बुकिंगची माहिती घेण्यासाठी गर्दी करत आहेत. नागरिकांनी घरी बसून क्यूआर कोडच्या माध्यमातून ई केवायसी करावी. त्यासाठी क्यूआर कोड उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

जिल्ह्यात एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी ऑनलाईन बुकिंग करावी, त्यांना विहित केलेल्या कालावधीत घरपोच गॅस सिलिंडर मिळणार आहे. शहर व जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. गरज नसताना बुकिंग करू नये. सोलापूर जिल्ह्यासाठी पेट्रोल, डिझेल व एलपीजीचा मागणीप्रमाणे साठा उपलब्ध होत आहे, असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news