

Solapur BJP Campaign
मोहोळ शहर : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव तसेच शिक्षक मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांना अधिकाधिक मताधिक्याने विजयी करण्यासाठी पदवीधर व शिक्षक मतदारांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन भाजपचे निरीक्षक तथा माजी आमदार कृणाल पाटील यांनी केले.
मोहोळ येथे सकाळी दहा वाजता आयोजित पदवीधर व शिक्षक मतदारांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेण्यात आला. मतदारांशी संपर्क, संघटनात्मक तयारी आणि निवडणुकीच्या नियोजनाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
या बैठकीस पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांना विजयी करावे या बैठकीत मा आ राजनजी पाटील यांच्यासह माजी आमदार यशवंत माने, अजिंक्यराणा पाटील, जिल्हाध्यक्ष नाना चव्हाण, प्रकाश चवरे, सतीश काळे, रमेश माने, संजीव खिलारे आदी उपस्थित होते.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारांशी संपर्क वाढविणे, संघटनात्मक पातळीवर नियोजन करणे आणि निवडणुकीच्या कामाला गती देणे यावर भर दिला. पक्षाच्या उमेदवारांना अधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.