

सोलापूर : रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्याचा विचार करून पुणे-बंगळूर या दोन शहरांदरम्यान व सोलापूर विभागाद्वारे पुणे-बंगळूर विशेष रेल्वे धावणार आहे. या रेल्वेमुळे सोलापूरकरांचा कर्नाटकातील बंगळूरसह अन्य ठिकाणचा प्रवास सुरक्षित व सोयीस्कर झालेला आहे.
गाडी क्रमांक 01413 पुणे-बंगळूर विशेष रेल्वे शनिवारी (दि. 6) सुरू झाली आहे. सायंकाळी 7 वाजता पुणेच्या स्थानकावरून सुटून ती दुसऱ्या दिवशी सकाळी 11.15 वाजता बंगळूरच्या केएसआर स्थानकावर पोहोचेल. गाडी क्रमांक 01414 बंगळूर-पुणे विशेष ट्रेन आज रविवारी (दि. 7) दुपारी 1 वाजता केएसआर या बंगळूर या स्थानकातून सुटली असून, दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता पुणेच्या स्थानकावर पोहोचेल.
ही रेल्वे गाडी क्रमांक 06263 बंगळूर-पुणे स्पेशल रविवारी (दि. 7) सायंकाळी 7.30 वाजता केएसआर बंगळूरहून निघाली आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 2.30 वाजता पुण्यात पोहोचेल. गाडी क्रमांक 06264 पुणे-बंगळूर स्पेशल सोमवारी (दि. 8) दुपारी 3.30 वाजता पुण्यातून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9.30 वाजता बंगळूर कॅन्टोन्मेंटला पोहोचेल. ही गाडी अठरा कोचसह धावणार आहे, याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा.