Solapur murder: नंदेश्वरात थोरल्याचा लहान भावाकडून खून

दारूड्या थोरल्या भावाचा धाकट्या भावाने कौटुंबिक वादातून केलेल्या हाणामारीत मृत्यू झाला
Murder Case
Murder CasePudhari
Published on
Updated on

मंगळवेढा : दारूड्या थोरल्या भावाचा धाकट्या भावाने कौटुंबिक वादातून केलेल्या हाणामारीत मृत्यू झाला. याप्रकरणी मंगळवेढा पोलिसांत खुनाची नोंद करण्यात आली असून ही घटना तालुक्यातील नंदेश्वर येथे घडली.

मोटे वस्तीवर राहणारा कृष्णात धोंडिबा मोटे (वय 37) हा व्यसनाधीन होता. दारूच्या नशेत तो घरातील सदस्यांशी वारंवार वाद घालत असे. त्याचा धाकटा भाऊ दत्तात्रय मोटे काही काळ गावाबाहेर राहत होता. दि. 10 एप्रिल रोजी रात्री कृष्णात घरी आल्यानंतर पुन्हा वाद निर्माण झाला. कुटुंबीयांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला; मात्र परिस्थिती नियंत्रणात आली नाही. रात्री उशिरा वाद वाढत जाऊन झटापटीत रूपांतर झाले.

यावेळी मारहाणीत कृष्णात गंभीर जखमी झाला. त्याला प्रथम मंगळवेढा रुग्णालयात, त्यानंतर सांगोला येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या प्रकरणी वडील म्हाळू धोंडिबा मोटे (वय 60) यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. दत्तात्रय मोटे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news