Solapur News : प्रिसिजन महोत्सवात स्वरांची मैफिल

सात, आठ फेब्रुवारीला आयोजन; देवकी पंडित, मंजिरी कर्वे यांना ऐकण्याची संधी
Solapur News
प्रिसिजन महोत्सवात स्वरांची मैफिल
Published on
Updated on

सोलापूर ः सोलापुरातील शास्त्रीय संगीतप्रेमींसाठी पवर्ण ठरणाऱ्या प्रिसिजन संगीत महोत्सवात यंदा पाच कलाकारांच्या गायन, वादनाचा आनंद घेता येणार आहे. प्रिसिजन फाऊंडेशनच्या वतीने 7 आणि 8 फेब्रुवारी रोजी हुतात्मा स्मृती मंदिरात हा संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महोत्सवाचे हे अकरावे वर्ष आहे. दररोज दोन सत्रात हा कार्यक्रम होणार आहे. पहिल्या दिवशी सात फेब्रुवारी रोजी सतार आणि गायनाची मैफल रंगणार आहे. प्रख्यात सतारवादक निखिल पटवर्धन यांचे सतारवादन होईल. त्यांना पांडुरंग पवार तबल्यावर साथ करतील. दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध गायिका मंजिरी कर्वे-आलेगावकर यांचे शास्त्रीय गायन होईल. त्यांना सौरव दांडेकर (हार्मोनियम) आणि अजित किंबहुने (तबला) तर प्राची जोगळेकर (तानपुरा) साथसंगत करतील.

दुसऱ्या दिवशी म्हणजे आठ फेब्रुवारी रोजी बासरी, व्हायोलिन आणि स्वरसाधना कार्यक्रम रंगणार आहे. पहिल्या सत्रात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक एस. आकाश यांचे बासरीवादन होईल. त्यांना ईशान घोष तबल्यावर साथ देतील. याच सत्रात यज्ञेश रायकर यांचे व्हायोलिनवादन सादर होणार आहे. महोत्सवाच्या अंतिम सत्रात सुप्रसिद्ध गायिका देवकी पंडित आपली स्वर-साधना रसिकांसमोर मांडतील. त्यांना प्रशांत पांडव (तबला) आणि अभिषेक शिनकर (हार्मोनियम) वर साथसंगत करतील. शास्त्रीय संगीत आणि कलांचा प्रचार-प्रसार, नव्या श्रोत्यांमध्ये संगीताची गोडी निर्माण करणे आणि मोठ्या प्रमाणावर रसिकांपर्यंत कला पोहोचवणे या उद्देशाने प्रिसिजन संगीत महोत्सव सुरू करण्यात आला. मागील 10 वर्षांत हा महोत्सव सोलापूर शहराची सांस्कृतिक ओळख बनला असल्याचे डॉ. सुहासिनी शहा यांनी सांगितले. यावेळी माधव देशपांडे, नितीन फलटणकर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news