

तुळजापूर : आमदार प्रवीण दरेकर यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सचिन पाटील यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
भाजपा नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी दुपारी तुळजाभवानी देवीच्या मंदिरात देवीचे मनोभावे दर्शन घेतले, आरती केली. याप्रसंगी बाजार समितीचे माजी सभापती सचिन पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद कंदले, युवक नेते राम चोपदार पुजारी राम छत्रे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार प्रवीण दरेकर यांनी तुळजाभवानी मंदिरामध्ये सुरू असलेल्या जीर्णोद्धाराच्या कामाची पाहणी केली. तुळजाभवानी देवीच्या मंदिराची ख्याती मोठी आहे. देशपातळीवर हे मंदिर आगामी काळामध्ये लौकिक पात्र आहे. मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांची सोय करणे अत्यावश्यक आहे, अशा भावना व्यक्त केल्या.