Ambedkar Jayanti : बाबासाहेबांचे जीवनकार्य जनतेपर्यंत पोहोचवणार

प्रशिक संस्था; न्यायालयीन नियमांचे पालन करत यंदा भीमजयंती उत्साहात साजरी होणार
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti
Published on
Updated on

दीपक शिराळकर

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी क्षण जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शहरातील प्रशिक सामाजिक संस्था सज्ज झाली आहे. यंदाची भीमजयंती सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे काटेकोर पालन करत उत्साहात साजरी करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. फुले-शाहू-आंबेडकर चळवळीला अभिप्रेत असणारा सुजाण समाज घडवण्याच्या उद्देशाने 2012 मध्ये या संस्थेची स्थापना झाली. डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या बौद्ध धर्मातील प्रज्ञा, शील आणि करुणा या त्रिसूत्रीचा आधार घेत संस्था कार्यरत आहे. उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे बाबासाहेबांच्या जीवनातील विविध पैलूंवर आधारित जिवंत देखावे. प्रशासनाने आणि सुप्रीम कोर्टाने लाऊडस्पीकर व इतर अटींबाबत जे नियम घालून दिले आहेत, त्यांचे पालन करूनच सर्व कार्यक्रम पार पडतील, अशी ग्वाही संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे. वैचारिक प्रबोधन आणि शिस्तबद्ध सादरीकरण याद्वारे भीमजयंतीचा आदर्श उत्सव साजरा करण्याचा प्रशिकचा मानस आहे.

महिला सक्षमीकरणासाठी प्रशिकचा पुढाकार

प्रशिक सामाजिक संस्थेच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून महिला आणि तरुणांच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य सुरू आहे. सामाजिक चळवळ अधिक गतिमान व बळकट करण्याच्या उद्देशाने संस्था सातत्याने विविध उपक्रम राबवत असून, समाज परिवर्तनासाठी या माध्यमातून मोठे प्रयत्न केले जात आहेत.

डॉ. आंबेडकरांंच्या जीवनावर प्रबोधनात्मक देखावा

प्रशिक सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी भीमजयंतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील विविध पैलू उलगडले जातात. चित्रकार आणि व्हायोलिन वादक या देखाव्यांनंतर, यंदा नाव गाजतंय जगभर या संकल्पनेवर आधारित विशेष देखावा साकारला जाणार आहे.

सांस्कृतिक उत्सवातून प्रशिकचा वैचारिक जागर

प्रशिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, छत्रपती शाहू महाराज जयंती व धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. संस्थेचा लेझीम ताफा मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असतो. या उपक्रमांतून सांस्कृतिक वारसा जपण्यासोबतच समाजातील युवा पिढीला चळवळीशी जोडण्याचे मोलाचे कार्य संस्था सातत्याने करत आहे.

प्रशिक सामाजिक संस्थेच्या मिरवणुकीचे यंदा दहावे वर्ष आहे. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व अटी व शर्तींचे पालन करूनच लाऊडस्पीकरचा वापर केला जाईल. कायद्याचा सन्मान राखून आणि सामाजिक शिस्त पाळून महामानवाचा गौरव व भीमजयंतीचा हा ऐतिहासिक सोहळा मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्याचा आमचा संकल्प आहे.
- सुशील सरवदे, संस्थापक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news